Join us  

"अस्सी तोरांतो विच रेहेंदे आं...", नेटीझन्सला भारीच आवडली कॅनेडियन तरुणीची पंजाबी! - पाहा व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2022 8:06 PM

Canadian Women Speaking In Punjabi: नेटिझन्सला कधी काय आवडेल आणि कोणती गोष्ट सोशल मीडियावर हिट होईल, काहीच सांगता येत नाही. हा व्हिडिओ पण त्यातलाच आहे.

ठळक मुद्देमुळातच पंजाबी भाषा ऐकायला अतिशय गोड वाटते. त्यात जेव्हा एखादी परदेशी मुलगी ती भाषा तिच्या खास इंग्लिश ऍकसेन्टमध्ये बोलते, तेव्हा ते ऐकणं आणखीच छान वाटतं. 

परदेशी लोक जेव्हा भारतीय संस्कृती जाणून घेण्याचा, भारतीय पदार्थ खाऊन बघण्याचा किंवा करून बघण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ते पाहून भारतीय लोक सुखावून जातात. एवढंच नाही तर परदेशी लोकांनी केलेली भारतीय वेशभूषा, बॉलिवूड संगीतावरचं त्यांचं प्रेम हे सगळं पाहूनही भारतीयांना खूप आनंद होतो. म्हणूनच तर अशाच पद्धतीचा एक कॅनेडियन तरुणीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर गाजतो आहे. (Canadian Women Speaking In Punjabi)

 

sarahhww (सारा व्हीकेत) या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सारा कॅनडा येथील पॉप सिंगर आणि गीतकार आहे, हे तिच्या इंस्टा पेजवरून लक्षात येतं. तिने भारतीय संगीत, भारतीय पद्धतीच लग्न, भारतीय जेवण याविषयी चे अनेक व्हिडीओ इन्स्टाग्राम वे पोस्ट केले आहेत. आता तिचा जो लेटेस्ट व्हिडीओ आहे, त्यात ती पंजाबी बोलण्याचा प्रयत्न करते आहे.

 

मुळातच पंजाबी भाषा ऐकायला अतिशय गोड वाटते. त्यात जेव्हा एखादी परदेशी मुलगी ती भाषा तिच्या खास इंग्लिश ऍकसेन्टमध्ये बोलते, तेव्हा ते ऐकणं आणखीच छान वाटतं. "I tried my best…" असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे. "मै टोरांतो तो हा, मेरा बॉयफ्रेंड दिल्ली तो हा, पर मेरा बॉयफ्रेंड टोरंतो वी तो हा, असिन टोरंतो विच रेहेंदे आ.." असं सांगत तिने तिची आणि तिच्या बॉयफ्रेंड ची माहिती दिली आहे. पंजाबी शब्द उच्चारण्याची तिची स्टाईल आणि तिची भाषा या दोन्ही गोष्टी अतिशय सुरेख असून, त्यामुळेच तर नेटीझन्सनी तो एवढा डोक्यावर घेतला आहे.

 

टॅग्स :सोशल व्हायरलइन्स्टाग्रामअमेरिकाकॅनडा