Join us  

Workout in saree : १ नंबर! वयाच्या ५६ व्या वर्षी साडी नेसून व्यायम करते महिला, व्हिडिओ पाहून लोक म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 9:10 PM

Age of 56 wearing a sari a woman did wonders in the gym : व्हायरल व्हिडीओमध्ये महिला साडी नेसून अगदी आत्मविश्वासानं जिम वर्कआऊट करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर रोजच एकापेक्षा एक व्हिडिओज व्हायरल होत  असतात.  काही व्हिडिओ पाहून  मनाला खूपच आनंद मिळतो. आजकाल लोक सोशल मीडियावर आपला जास्तीत जास्त वेळ घालवतात. सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये ५६ वर्षाांची महिला  साडी नेसून वर्कआऊट करत आहे. तिचा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक चकीत होत आह आणि कमेंट्समध्ये  कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. यापेक्षा सुंदर व्हिडिओ मी कधीच पाहिला नाही अशी कमेंट या व्हिडिओवर युजर्सकडून केली जात आहे. (At the age of 56 wearing a sari a woman did wonders in the gym people said zindabad zindabad)

व्हायरल व्हिडीओमध्ये महिला साडी नेसून अगदी आत्मविश्वासानं जिम वर्कआऊट करताना दिसत आहेत.  सोशल मीडियावर लोक या महिलेचे कौतुक करत आहेत. त्याचबरोबर कमेंट करताना ते लिहित आहेत की ही महिला भारतीय संस्कृती विसरलेली नाही. आम्हाला अशा स्त्रीयांचा अभिमान आहे. एकीकडे बरेच लोक वर्कआऊट न करण्याची कारणं देताना दिसतात तर ही महिला  साडी नेसून व्यायाम करत आहे म्हणूनच अनेकांसाठी ती प्रेरणादायी ठरली आहे.

रात्री फक्त १ चमचा तूप चेहऱ्यावर लावा! तूप लावून येईल रूप, पाहा वापराची योग्य पद्धत

हा व्हायरल व्हिडिओ Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर humansofmadrasoff नावाच्या युजरने शेअर केला असून तो चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. या व्हायरल व्हिडिओवर कमेंट करताना लोक म्हणत आहेत की, ही महिला फिटनेस आणि संस्कृती या दोन्हीची काळजी घेत आहे. यावर कमेंट करताना आणखी एका युजरने लिहिले आहे - हा खूप क्यूट व्हिडिओ आहे.

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल