बॉलिवूडचा अँग्री मॅन अर्थात सुनील शेट्टी यांची कन्या अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के. एल. राहुल ही जोडी अनेक दिवसांपासून चर्चेत होती. आज हे जोडपं लग्नबंधनात अडकणार आहे. सध्या त्यांच्या लग्नसोहळ्याला सुरुवात झाली असून, हा लग्न सोहळा सुनील शेट्टी यांच्या खंडाळा फार्महाऊसवर पार पडत आहेत. या भव्य लग्नाची तयारी खूप आधीपासूनच सुरू झाली होती. संगीत सोहळ्यात जवळचे लोकच उपस्थित होते. दरम्यान, या लग्नातील एक विशिष्ट गोष्ट सगळ्याचं लक्ष वेधून घेण्यास यशस्वी ठरली आहे.
या लग्नात खास साऊथ इंडियन मेन्यू असणार आहे. तर, लग्न देखील दक्षिणात्य पद्धतीने पार पडणार आहे. केळीच्या पानावर जेवणाच्या पंगती वाढल्या जाणार आहेत. अर्थात हा लग्न सोहळा अतिशय पारंपारिक पद्धतीने पार पडणार आहे. केळीच्या पानावर जेवल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.
केळीच्या पानावर खाण्याचे फायदे
भारत हा देश संस्कृतींचा महासागर मानला जातो, इथे पेहरावापासून खाण्यापिण्यापर्यंत सर्व गोष्टी संस्कृतीनुसार केल्या जातात. यापैकी एक म्हणजे साऊथ इंडियन पद्धत. साऊथ इंडियन लोकं केळीच्या पानावर जेवतात. केळीच्या पानांवर अन्न खाल्ल्याने, शरीरातील पोषक तत्वांची कमतरता भरून निघते. केळीप्रमाणेच त्याच्या पानांमध्येही पोषक तत्त्वे असतात आणि त्यावर गरम अन्न टाकताच ते अन्नामध्ये मिसळतात.
केळीच्या पानावर जेवल्याने गॅस, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता आणि अपचन यांसारख्या पोटाच्या समस्या दूर होतात. केळीपासून जे अँटीऑक्सिडंट्स मिळतात, ते केळीच्या पानातूनही मिळतात. त्यामुळे केळीच्या पानांवर जेवण करावे, असा सल्ला देण्यात येतो.