Join us  

गुढीपाडवा विशेष: अवघ्या ५ मिनिटात काढा गुढीची सुरेख रांगोळी; एक पळी घ्या अन् भोवतीने आकर्षक रंग भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2024 12:32 PM

Attractive Gudipadwa special rangoli design by using Spoon : छापा सोडा- फक्त ५ मिनिटात पळीच्या मदतीने काढा गुढी पाडवा स्पेशल सुंदर रांगोळी..

चैत्र शुक्ल प्रतिपदेला महाराष्ट्र नसून, अनेक राज्यांमध्ये गुढीपाडवा साजरा करण्यात येतो (Gudhi Padhava). या दिवसापासून हिंदू नववर्षाला सुरुवात होते. या दिवशी गुढी उभारली जाते (Rangoli Design). शिवाय श्रीखंड पुरीचा बेत, घरभर फुलांचे तोरण आणि बाहेर सुरेख रांगोळी काढण्यात येते. काही महिलांना रांगोळी काढणे म्हणजे फार अवघड वाटते.

काहींना चिमटीत रांगोळी धरता येत नसल्यामुळे, त्या छापा काढून मोकळे होतात. पण प्रत्येक वेळी छापा का? आपण घराबाहेर पळीचा वापर करूनही सुरेख रांगोळी काढू शकता. पळीचा वापर करून काढलेली रांगोळी, दाराबाहेर शोभून दिसते. मुख्य म्हणजे अवघ्या ५ मिनिटात ही रांगोळी काढता येते. पळीचा वापर करून रांगोळी नेमकी कशी काढायची? पाहूयात(Attractive Gudipadwa special rangoli design by using Spoon).

पळीचा वापर करून रांगोळी कशी काढायची?

सर्वप्रथम, आपण ज्यापद्धतीने गुढी उभारतो, त्याचप्रमाणे पळी आडवी उलट्या बाजूने ठेवा, व त्याच्या भोवतीने रांगोळी सोडून बॉर्डर तयार करा. वरच्या गोल बाजूस कलशाचा आकार द्या, आणि खालच्या बाजूस काठीचा आकार द्या. आपण कलशामध्ये आपल्या आवडीचा रंग भरू शकता. आपण त्यात दोन रंग मिक्स करून भरू शकता. जेणेकरून कलश आकर्षक दिसेल.

तळल्यावर पुऱ्या तेलकट होतात? पीठ भिजवताना घाला १ पांढरा पदार्थ, पुऱ्या तेलकट होणारच नाहीत

आता खालच्या बाजूच्या काठीमध्ये ब्राऊन रंग भरा. कलशाच्या मध्यभागी आपण स्वास्तिक काढू शकता. जर आपल्याला स्वास्तिक काढायचं नसेल तर, आपण इतर डिझाईनही काढू शकता. नंतर कलशाच्या खालच्या कोपऱ्यावर रेष ओढून काठीपर्यंत आणा. उडता साडीचा पदर रांगोळीने तयार करा, आणि त्यात रांगोळीचे रंग भरा.

करिना कपूरला आवडतो स्पेशल दाल तडका, पाहा फोडणी घालण्याची तिची अनोखी पद्धत

कलशाच्या भोवतीने आपण फुलांच्या माळा, साखरेच्या गाठी आणि हिरवी पानं काढू शकता. जेणेकरून गुढीला सुंदर लूक मिळेल. शिवाय हवं असल्यास आपण रांगोळीच्या भोवतीने सुंदर नाजूक डिझाईन काढू शकता. अशा प्रकारे आपली सुंदर-सिंपल अवघ्या ५ मिनिटात गुढीची रांगोळी तयार.

टॅग्स :गुढीपाडवारांगोळीसोशल व्हायरलसोशल मीडिया