किती जाडी दिसतेस, वजन किती वाढलं आहेस, केवढी गुटगुटीत झाली हे कुणाही महिलेला सर्रास सहज म्हणणं आणि त्यात त्या महिलेचा आपण अपमान करतो आहोत याचा अजिबात विचार न करणं ही टिपिकल वृत्ती आपल्या समाजात दिसते. अगदी लग्न ते हळदीकुंकू ते शाळांचे गेट टुगेदर ते सोशल मिडिया काहीच याला अपवाद नाही (Jaspreet Bumrah). सेलिब्रिटींनाही कुणीही काहीही बोलते. तसेच नुकतेच झाले, भारताचा फास्टेट बॉलर जसप्रीत बुमराहची आणि त्याच्या पत्नीने व्हॅलेण्टाइन्स डे निमित्त बुमराहच्या अकाऊंटवर कोलॅब केले होते (Social Viral).
पोस्टच्या कमेण्ट सेक्शनमध्ये एका नेटकऱ्याने बुमराहची बायको संजना गणेशनला सांगितलं की भाभी, मोटी लग रही हो! संजनाने त्याला चांगलेच खडसावले('Auraton ke bodies ke baare mein…': Sanjana Ganesan shuts down troll calling her 'moti').
टीम इंडियाचा स्टार बॉलर जसप्रीत बुमराहची बायको हीच तिची एकमेव ओळख नाही. ती प्रसिद्ध स्पोर्ट्स ब्रॉडकास्टर आहे. संजना गणेशन सोशल मीडियात चर्चेत राहते. संजना आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. नुकतंच इस्टाग्रामवर व्हॅलेण्टाइन्स डेच्या प्रोमोशनल व्हिडिओमध्ये त्यांनी टाकला होता. त्या एका नेटकऱ्याने 'भाभी मोटी लग रही है', अशी कमेण्ट केली.
हृदयद्रावक! पाळणा समजून आईनेच पोटच्या गोळ्याला ठेवले चालू ओव्हनमध्ये, काही वेळानंतर..
संजना रिप्लाय देत म्हणाली, 'शाळेतला विज्ञान हा विषय तुमच्या लक्षात राहत नाही. आला मोठा शहाणा बायकांच्या बॉडीवर कमेण्ट करतोय. पळ इथून.' या कमेण्टवर नेटकऱ्यांनी संजनाची बाजू घेत, ट्रोलरला झापले.
'ऐसा लग रहा है, मै जन्नत के बिचोंबीच खडी हूं!' - पाहा काश्मिरी मुलींचे सुंदर निरागस रिपोर्टिंग
मात्र हे सगळेच किती विचित्र आणि अपमानास्पद असावे. स्वत:ची पात्रता-कर्तृत्व काहीही नसताना कुणाही महिलेला वजन, दिसणे यावरुन बोलणे आणि अपमान करणे याचे कुणालाच काहीच वाटत नाही. हे या प्रकारचं बॉडी शेमिंग थांबणार की नाही हाच प्रश्न आहे.