वजन एक ते दोन किलो वाढलं तरी अनेकजण चिंतेत येतात आपलं वजन कमी व्हावं असं प्रत्येकालाच वाटतं वजन कमी करण्यासाठी अनेक डाएट प्लॅन्स उपलब्ध आहेत. २५ वर्षीय सामंथा अब्रू नावाच्या मुलीने जवळपास ६८ किलो वजन कमी केलं आहे. (Australian Nurse Weight Loss Tricks) सामंथा ही ऑस्ट्रेलियाची रहिवासी असून तेथिल एका रुग्णालयात नर्सचा जॉब करते. स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देता येत नसल्यामुळे तिचं वजन ११५ किलोंनी वाढलं. म्हणूनच तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. तिने रेग्युलर चालणं सुरू केलं आणि आपल्या आहारातून अन्हेल्दी पदार्थ वगळले आणि तिचे वजन ४७ किलोंनी कमी झालं. (Australian Nurse Sheds Almost 45 Kgs With Walking)
न्युयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार चुकीच्या लाईफस्टाईलमुळे समंथाचे वजन वाढले होते. लहानपणापासूनच तिला फिजिकल एक्टिव्हीज करायला फारसं आवडत नव्हते. जेवल्यानंतर ती नेहमीच टोस्ट खायची. वजन जास्त वाढल्यामुळे तिने लॉकडाऊनमध्ये जास्त चालायला सुरूवात केली. ज्यामुळे तिच्या मानसिक आरोग्यात सुधारणा होऊ लागली. (115 Kg Women Loses 47 kg by Walking 100 Steps A Day With Simple Walk)
कंबर दुखते-थकवा जाणवतो? मूठभर शेंगदाणे नियमित खा; हाडं होतील मजबूत-अशक्तपणा कमी
रोज १० हजार पाऊलं चालून समंथाने वजन कमी केलं
मीडिया रिपोर्टनुसार जेव्हा समंथा रोज १० हजार पाऊल चालायची तेव्हा ती आठवड्यात ५ किलोमीटर धावायची. ४ दिवस जिमलासुद्धा जायची. वजन घटवण्यासाठी रोज १० हजार पाऊलं चालणं एक उत्तम स्ट्रॅटेजी असते. नियमित चालल्याने मांसपेशी मजबूत होतात आणि मेटाबॉलिझ्म बुस्ट होण्यास आणि कॅलरीज बर्न होण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी हे डाएट फॉलो करा
वजन कमी करण्यासाठी फक्त व्यायामच नाही तर डाएट करणंसुद्धा आवश्यक असते. समंथाने आपल्या आहारातून पिज्जा, बर्गर हे पदार्थ वगळले होते आणि हेल्दी फूड आयटम्सचा आपल्या आहारात समावेश केला होता. दिवसा ती ओट्स खायची तर दुपारी किंवा रात्रीच्या जेवणात चिकन खात होती.
केस खूपच पातळ झालेत? दाट-लांब केसांसाठी खा 'हे' ५ आंबट पदार्थ, पटापट वाढतील केस
वजन कमी करण्यासाठी रेग्युलर एफर्ट्स महत्वाचे आहेत
वजन कमी करणं हा एक प्रवास आहे ज्यासाठी रोज मेहनत करणं गरजेचं असतं. समंथाने स्वत:चे ४७ किलो वजन कमी करण्यासाठी जवळपास १ वर्ष मेहनत घेतली. वजन कमी करण्यासाठी लागणारा वेळ हा प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळा असू शकतो.