जर आपल्याला कुठेही प्रवास करण्यासाठी एखादे वाहन वेळेत पकडायचे असेल तर आपण ती वेळ पाळतो. लांबवरचा प्रवास करण्यासाठी आपण काहीवेळा बस, ट्रेन, विमान यासारख्या वाहनातून प्रवास करणे पसंत करतो. जर आपल्याला एखाद्या निश्चित स्थळावरुन अमुक एका ठराविक वेळी गाडी पकडून प्रवास करायचा असेल तर आपण वेळेआधी हजर राहतो. जर का ही वेळ चुकली तर आपल्यावर डोक्याला हात लावून बसण्याची वेळ येते. आपल्यापैकी काहीजणांना त्यांच्या आयुष्यात हा अनुभव कधी ना कधी आलाच असेल(Australian woman runs onto tarmac, stops flight from flying without her).
सध्या सोशल मिडीयावर अशाच एका मुलीचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या बहादूर मुलीने चक्क विमानाच्या पायलटला हात दाखवून विमान थांबवण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्यात हे धाडस नक्की कुठून आलं असेल ? तिने नेमकं केलं तरी काय ? आतापर्यंत आपण हात दाखवून ट्रेन, बस थांबविण्याच्या व वाहन पकडण्यासाठीचे किस्से सर्रास ऐकले असतील किंवा पाहिले असतील. पण एका महिलेने धावपट्टीवर धावत जाऊन पायलटला विमान थांबवण्याचा इशारा दिल्याचे व्हिडीओत दिसत आहे(Woman runs onto tarmac to catch flight, yells at pilot to stop. Watch).
टेक ऑफ घेत असणाऱ्या विमानाला का बरं थांबवल....
टेक ऑफ घेत असणाऱ्या विमानाला चक्क रनवेवर धावत येऊन हात दाखवत थांबविणाऱ्या मुलीच्या व्हायरल व्हिडीओची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. ही घटना कॅनबेरा विमानतळावर घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. एका ऑस्ट्रेलियन महिलेने तिला विमानांत न घेताच उड्डाण करत असलेल्या विमानाचे टेक ऑफ चक्क थांबविले असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. एक ऑस्ट्रेलियन महिला, तिला सोडून उड्डाण घेत असलेल्या विमानाचे उड्डाण रोखण्यासाठी धावपट्टीवर धावत असताना तिला अटक करण्यात आली. ही महिला विमानतळाच्या सुरक्षेचे सगळे नियम तोडून चक्क धावत रनवेवर आली. रनवेवर येताच तिने टेक ऑफ घेत असलेल्या विमानाच्या पायलटला हात दाखवत विमान थांबवून तिला आत बसू देण्याची विनंती करत आहे.
या महिलेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या पोस्टने सध्या सर्वच नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हिडिओमध्ये ती महिला फ्लाइटच्या खाली चालताना आणि पायलटला फ्लाइट थांबवण्यास सांगताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेला जामीन नाकारण्यात आला असून तिला ३ नोव्हेंबरला न्यायालयात हजर राहायचे आहे. व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की, ' फ्लाइट चुकलेल्या एका महिलेने E190AR विमानाच्या (VH-XVO) मागे धावून पकडण्याचा प्रयत्न केला. १ नोव्हेंबर २०२३ रोजी कॅनबेरा विमानतळावर (CBR) ही विचित्र घटना घडली. फ्लाइटचा पाठलाग करत असताना ती महिला पायलटच्या दिशेने हात फिरवू लागली.
नेटकरी म्हणत आहेत...
ही पोस्ट काही तासांपूर्वीच सोशल मिडीयावर शेअर करण्यात आली होती. शेअर केल्यापासून, त्याला १००० पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या पोस्टला असंख्य लाईक्स आणि कमेंट्सही सोशल मिडीयावर मिळाल्या आहेत.