Lokmat Sakhi >Social Viral > बार्बी डॉल वो लाखों की! बार्बीसारखं दिसण्यासाठी ‘तिने’ खर्च केले ८२ लाख...

बार्बी डॉल वो लाखों की! बार्बीसारखं दिसण्यासाठी ‘तिने’ खर्च केले ८२ लाख...

Meet Jazmyn Forest, who spent over Rs 82 lakh to look like real-life Barbie : २५ वर्षांच्या तरुणीनं ठरवलं आपण बार्बी डॉलसारखंच दिसायचं, महागडी सर्जरी करुन तिनं स्वत:चं रुप पालटलं पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2023 06:37 PM2023-05-26T18:37:54+5:302023-05-26T18:48:16+5:30

Meet Jazmyn Forest, who spent over Rs 82 lakh to look like real-life Barbie : २५ वर्षांच्या तरुणीनं ठरवलं आपण बार्बी डॉलसारखंच दिसायचं, महागडी सर्जरी करुन तिनं स्वत:चं रुप पालटलं पण...

Australian woman spends more than Rs 82 lakh to transform herself into ‘real life Barbie princess’ | बार्बी डॉल वो लाखों की! बार्बीसारखं दिसण्यासाठी ‘तिने’ खर्च केले ८२ लाख...

बार्बी डॉल वो लाखों की! बार्बीसारखं दिसण्यासाठी ‘तिने’ खर्च केले ८२ लाख...

बार्बी डॉल, आपल्यापैकी कित्येक मुलींचे बालपण या बार्बी डॉलशी खेळण्यात गेले असेल. दिसायला सुंदर, कोणत्याही बाहुलीला शोभून दिसेल असा सडपातळ बांधा, लांबलचक केस, चाफेकळी नाक, गुलाबी ओठ, नाजूक डोळे अशी ही सुंदर बार्बी डॉल. अशी सुंदर, नाजूक, सडपातळ बांद्याची बाहुली बघून कोणत्याही तरुणीला आपण तिच्यासारखे छान, सुंदर दिसावे अशी इच्छा होणे साहजिकच आहे. स्त्रिया या त्यांच्या दिसण्याबाबतीत खूपच काटेकोर असतात. आपण सुंदर दिसावं असं प्रत्येक स्त्रीच स्वप्न असत. प्रत्येक मुलीला आपण एखाद्या परिकथेतील राजकुमारी सारख, किंवा सुंदरशा बाहुली सारख असावं असं अनेकदा वाटत असत. 

आतापर्यंत आपण बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी वेगवेगळ्या प्रकारच्या सर्जरी केल्याच्या अनेक गोष्टी ऐकल्या असतील. या अभिनेत्री सुंदर दिसण्यासाठी आपले ओठ, डोळे, नाक यांसारख्या विविध अवयवांची सर्जरी करून घेतात. यापैकी काहींच्या सर्जरीला यश येते तर काही बिघडतात. यामुळे सुंदर दिसण्याच्या नादात काही स्त्रिया काहीवेळा आपले नैसर्गिक सौंदर्य गमावून बसतात. आपले नैसर्गिक सौंदर्य घालवून कृत्रिमपणे सुंदर दिसण्यासाठी अनेकजणी खूप महागड्या सर्जरी करून घेतात. अशीच काहीशी एक घटना घडली आहे. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड येथील जॅझमिन फॉरेस्ट नावाच्या २५ वर्षीय मुलीने महागडी सर्जरी करुन  स्वत:ला पूर्णपणे वास्तविक जीवनातील बार्बी डॉल बनवले आहे(Australian woman spends more than Rs 82 lakh to transform herself into ‘real life Barbie princess’).

नेमकी काय आहे ही गोष्ट... 

क्वीन्सलँड ऑस्ट्रेलिया येथील २५ वर्षीय जॅझमिन फॉरेस्टने वास्तविक जीवनात बार्बी डॉल बनण्याच्या नादात अनेक शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. जॅझमिन फॉरेस्टने लहान वयात असतानाच या सगळ्या शस्त्रक्रिया करून स्वतःचे रूप बदलण्याचा निर्णय घेतला होता. जॅझमिन फॉरेस्टने १८ व्या वर्षी ब्रेस्ट ऑगमेंटेशन सर्जरीद्वारे तिच्या परिवर्तनाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. तेव्हापासून तिने अनेक प्लास्टिक सर्जरी आणि कॉस्मेटिक प्रक्रिया केल्या आहेत. त तिचा प्रवास अजूनही संपलेला नाही, कारण तिच्याकडे अजूनही 'ड्रीम सर्जरी' ची एक लांबलचक यादी आहे. तिला अजूनही आपल्या शरीरावर अनेक प्रकारच्या 'ड्रीम सर्जरी' करायच्या आहेत. news.com.au. शी बोलताना तिने या परिवर्तनाचा तिच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला असल्याचे सांगितले आहे. जॅझमिन फॉरेस्टने वास्तविक जीवनात बार्बीसारखे दिसण्यासाठी $ १००,००० डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात रु. ८२,८२,९५०.०० इतके रुपये खर्च केले आहेत. सुंदर दिसण्यासाठीचे तिचे ध्येय गाठण्यासाठी तिने अनेक सर्जरी केल्या आहेत. तिने आतापर्यंत गाल, हनुवटी, जबडा आणि सौंदर्य खुलून येण्यासाठी अनेक इंजेक्शन्सही घेतली आहेत.  

कामाला जायला उशीर झाला, त्यात डेडलाइन डोक्यावर? बाइकवर लॅपटॉप उघडून काम करणाऱ्या ‘तिचं’ काय चुकलं?  

वयाच्या २४ व्या वर्षी, तिने पोट, हात, मांड्या, पाठीचा खालचा भाग, हनुवटी सुंदर दिसण्यासाठी पुन्हा वासर लिपोसक्शन सर्जरीची मदत घेतली आहे. जॅझमिन फॉरेस्टने अलीकडेच सोल, दक्षिण कोरिया येथे कपाळ कमी करण्यासाठी राइनोप्लास्टीसह अनेक प्लास्टिक सर्जरीज केल्या आहेत. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट jazmynforrest1 वर फोटो पोस्ट करुन तिला प्लास्टिक सर्जरी आवडत असल्याचे सांगितले आहे. लहानपणापासूनच असे उपचार घेण्याची तिची  इच्छा असल्याचे ती सांगते. सौंदर्य वाढवण्यासाठी भविष्यात आणखी उपचार घेण्यास मागेपुढे पाहणार नसल्याचेही ती सांगते.

अशा सर्जरीज करण्याबद्दल जॅझमिनचे म्हणणे आहे की.... 

"मी प्रथम किशोरवयीन असताना प्लास्टिक सर्जरी करण्याचा विचार केला." तेव्हा मला समजले की मला माझ्या शरीरात बदल करायचा असल्यास खूप मोठ्या  गुंतवणूकीची गरज लागणार आहे. "प्रत्येक शस्त्रक्रियेमुळे, मला स्त्री आणि पुरुष दोघांकडून चांगले उपचार मिळत गेले आणि त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढत गेला,"  

कोण म्हणते चिअर गर्लचे काम सोपे असते? हाताला प्लास्टर बांधून 'ती' मॅचला हजर.. कामावर प्रेम असावे ते असे..

हजारो तरुणांना प्रेमात पाडून ‘तिने’ कमावला प्रचंड पैसा, तंत्रज्ञानाचा वापर करुन केलं ‘भलतं’ डेटिंग...

मी आंघोळीपूर्वी माझे शरीर दिवसातून दोनदा पहाते आणि जेव्हा मी दात घासते तेव्हा दिवसातून दोनदा माझा चेहरा पहाते, त्यामुळे माझ्या आत्मसन्मान वाढीला खरोखर मदत होते." आपल्या शरीरावर आणि चेहेऱ्यावर खर्च करणे योग्य आहे कारण बाकीचे जग तेच सर्वात पहिल्यांदा पहाते. माझ्या दिसण्याशिवाय, मी आता जिथे पोहोचली आहे तिथपर्यंत पोहोचली नसती. डेटिंगपासून सामाजीकरणापर्यंत, तुम्ही हॉट असाल तर लोक तुम्हाला संधी देतात,” असे जॅझमिन हिचे मत आहे.

Web Title: Australian woman spends more than Rs 82 lakh to transform herself into ‘real life Barbie princess’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.