Join us  

१ नंबर! पाहा रिक्षावाल्याची कमाल, रिक्षेचं पालटलं रुप! एकसेएक सुविधांनी सजली रिक्षा..

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2022 5:02 PM

Auto rickshaw driver kept such things in his auto rider : एका रिक्षाचालकाचे प्रयत्न व्हायरल होत आहेत. वाहन चालकानं आपल्या वाहनात सॅनिटायझर, कँडी, बँडेज आणि इतर काही सामान ठेवले आहे.

आतापर्यंत तुम्ही रिक्षांचे खूप प्रकार पाहिले असतील पण असा प्रकार कधीही पाहिला नसेल. बंगळूरूमध्ये वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर असते. काही जणांना वेळेवर कार्यालयात पोहोचता येत नाही, मग गर्दी टाळण्यासाठी विविध मार्ग शोधणारेही अनेकजण आहेत. या ट्रॅफिक जॅममधून मार्ग कसा काढायचा याचा विचार अनेकजण करतात. (Viral Auto Rickshaw) एका ऑटो चालकाने तसाच प्रयत्न केला आहे. एका ऑटोचालकाने अशा गोष्टी आपल्या गाडीत ठेवल्या आहेत की त्यामुळे टाईमपास तर होईलच, पण त्याचं मनही ताजेतवाने होऊ शकतं. शहरातील प्रत्येक टॅक्सी आणि ऑटोरिक्षा चालकांची याला सामोरे जाण्याची एक विचित्र पद्धत आहे. (Auto rickshaw driver kept such things in his auto rider became happy photo viral)

चालत्या ट्रेनमधून २ वर्षांच्या मुलासह महिला पडली, RPF नं प्रसंगावधान दाखवलं अन्.....

ऑटोरिक्षा युनियननं  ऑटो  सेवा प्रदान करण्यासठी 'नम्मा यात्री' नावाचे अॅप लॉन्च केले आहे. यादरम्यान एका रिक्षाचालकाचे प्रयत्न व्हायरल होत आहेत. वाहन चालकानं आपल्या वाहनात सॅनिटायझर, कँडी, बँडेज आणि इतर काही सामान ठेवले आहे.  ही पोस्ट एका इंटरनेट युजरनं सोशल मीडियावर शेअर केली आहे.  उत्तम कश्यपनं या पोस्टमध्ये लिहिले की बेंगलुरूमध्ये मी रिक्षाचालक राजेश यांना भेटलो. त्यांनी आपल्या प्रवाश्यांसाठी सॅनिटायजर, बँडेज, बिस्किट्स, पाण्याच्या बॉटल्स आणि कॉफी बाईट चॉकलेट्सची व्यवस्था केली आहे.

हनुमान चालिसाचा ग्रंथही ठेवल्याचे चित्रात दिसत आहे. फोटो शेअर करणाऱ्या युजरने म्हटले की, 'त्यांनी मला सांगितले की ग्राहकच त्यांच्यासाठी सर्वस्व आहे. राजेश यांचे आभार. त्यांच्या  बिनशर्त हावभावाने माझा शुक्रवार हा माझा खास दिवस बनवला. ही पोस्ट 29 ऑक्टोबर रोजी शेअर करण्यात आली होती आणि या व्हिडिओला 1,000 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. 

अनेक इंटरनेट वापरकर्ते ड्रायव्हरच्या विचारसरणीचे कौतुक करत आहेत. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या पोस्टवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या. एका यूजरने लिहिले की, 'आम्हाला त्याच्यासारख्या आणखी लोकांची गरज आहे. त्यांच्या समस्यांवर तोडगा काढला तर विकासाच्या शर्यतीत आपण पुढे जाऊ शकतो.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया