Lokmat Sakhi >Social Viral > रात्री झोपताना ५ चुका टाळा, सकाळी लवकर जाग येईल - झोप होईल पूर्ण - वाटेल दिवसभर फ्रेश

रात्री झोपताना ५ चुका टाळा, सकाळी लवकर जाग येईल - झोप होईल पूर्ण - वाटेल दिवसभर फ्रेश

Avoid 5 Mistakes While Sleeping At Night : सकाळी लवकर जाग येण्यासाठी आपण रात्री झोपताना ज्या काही चुका करतो त्या समजून घेऊन सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न नक्की करूयात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2023 01:58 PM2023-02-18T13:58:46+5:302023-02-18T14:05:10+5:30

Avoid 5 Mistakes While Sleeping At Night : सकाळी लवकर जाग येण्यासाठी आपण रात्री झोपताना ज्या काही चुका करतो त्या समजून घेऊन सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न नक्की करूयात.

Avoid 5 mistakes while sleeping at night, you will wake up early in the morning - you will sleep well - you will feel fresh all day | रात्री झोपताना ५ चुका टाळा, सकाळी लवकर जाग येईल - झोप होईल पूर्ण - वाटेल दिवसभर फ्रेश

रात्री झोपताना ५ चुका टाळा, सकाळी लवकर जाग येईल - झोप होईल पूर्ण - वाटेल दिवसभर फ्रेश

योग्य आहार, व्यायाम यासोबतच पुरेशी झोप घेणं हे देखील उत्तम शारीरिक आरोग्यासाठी महत्वाचे आहे. चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येक व्यक्तीला पुरेशी झोप मिळणे गरजेचे असते. जेव्हा आपल्याला पुरेशी विश्रांती किंवा झोप मिळत नाही, तेव्हा आपला स्वभाव काहीसा चिडचिडा होतो याचा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाला आलाच असेल. रात्री उशीरा झोपणे आणि सकाळी लवकर उठणे, किंवा झोपेचे नियमित वेळापत्रक नसल्याने याचा परिणाम आपल्या खाण्यापिण्याच्या वेळांवरही होत असतो. पुरेशी झोप घेतल्यास दुसऱ्या दिवशी एक चांगला उत्साह निर्माण होऊन काम करण्यासाठी चांगली ऊर्जा निर्माण होते. रात्रीच्या झोपेने आरोग्याच्या अनेक छोट्या मोठ्या समस्या नक्कीच दूर होऊ शकतात. 


रात्री वेळेवर लवकर झोपण्यासोबतच सकाळी पहाटे लवकर उठणे हे देखील तितकेच महत्वाचे असते. रोज पहाटे उठणे, व्यायाम करणे, योग्य आहार घेणे, मोकळ्या वातावरणात फिरायला जाणे या सगळ्या सवयींमुळे शरीर तंदुरुस्त आणि निरोगी होते. परंतु सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे, रात्री उशिरापर्यंत काम करणे त्यानंतर उशिरा झोपणे. त्यामुळे लवकर उठणे कठीण झाले. आपण रात्री कितीही लवकरचा अलार्म लावून देखील आपल्याला सकाळी जाग येत नाही. सकाळी लवकर जाग येण्यासाठी आपण रात्री झोपताना ज्या काही चुका करतो त्या समजून घेऊन सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न नक्की करूयात(Avoid 5 Mistakes While Sleeping At Night).

नक्की कोणत्या आहेत त्या ५ चुका ? 

१. रात्रीच्या जेवणात खूप जड आहार घेणे :- रात्रीच्या जेवणात खूप जड आहार घेतल्याने आपल्याला झोप येण्यात खूपच त्रास होतो. झोपण्याच्या किमान ३ तास आधी रात्रीचे जेवण घ्यावे. आपण रात्रीच्या जेवणात कधी कधी खूपच रस्सेदार किंवा मसाला ग्रेव्ही असणाऱ्या भाज्या खातो. या रस्सेदार किंवा मसाला ग्रेव्ही असणाऱ्या भाज्या पचनास खूप वेळ लागतो. अशा भाज्यांचे सहज पचन होत नाही. त्यामुळे आपले शरीर या रस्सेदार किंवा मसाला ग्रेव्ही असणाऱ्या भाज्या पचवायला जास्त वेळ घेते. जेवल्यानंतर पुढील कित्येक तास आपल्या शरीरात ही पचनाची क्रिया चालू असते. पचनाची ही क्रिया शरीरात चालू असल्या कारणाने आपल्या झोपेच्या क्रियेत शरीर बदल करते. रस्सेदार किंवा मसाला ग्रेव्हीसोबतच आपले शरीर कडधान्य पचविण्यासदेखील जास्त वेळ घेते. त्यामुळे रात्रीच्या जेवणात रस्सेदार किंवा मसाला ग्रेव्ही असणाऱ्या भाज्या आणि कडधान्य खाणे शक्यतो टाळा. रात्रीच्या जेवणात हिरव्या पालेभाज्यांपासून तयार झालेल्या भाज्या खाणे सर्वात उत्तम पर्याय आहे. झोपण्यापूर्वी जड आहार घेतल्यास अपचन, छातीत जळजळ किंवा पचनाबाबत इतर समस्या उद्भवतात. शक्यतो रात्री हलका आहारच घ्यावा. रात्री जड आहार घेण्यासोबतच जर आपण खूप उशिरा जेवत असाल तर ते देखील आपल्याला झोप न येण्याचे मुख्य कारण असू शकते. 

२. झोपण्याआधी चहा - कॉफी पिणे टाळा :- आपल्यापैकी काही लोकांना झोपण्याआधी चहा - कॉफी पिण्याची सवय असते. परंतु ही सवय आपल्या शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने खूपच घातक ठरु शकते. चहा - कॉफी ही उत्तेजक पेय आहेत. कॉफीमध्ये कॅफेनचे प्रमाण भरपूर असते. झोपण्याआधी कॅफिनयुक्त पदार्थाचे सेवन केल्याने आपली झोप बिघडू शकते. कॅफिनयुक्त पदार्थ म्हणजे केवळ कॉफी नाही तर चहा आणि  चॉकलेटचा सुद्धा यात समावेश होतो. चहा, कॉफी घेतल्यानंतर आपल्याला चांगली झोप लागते असं वाटत असलं तरीही झोपण्याआधी चहा - कॉफी पिणे कधीही चांगले नाही.

३. गोड पदार्थ खाणे टाळा :- झोपण्याआधी मिठाई, केक, चॉकलेट यांसारखे गोड पदार्थ खाणे टाळा. झोपायच्या आधी भरपूर प्रमाणात गोड पदार्थ खाण्याची अनेकांना सवय असते. झोपायच्या आधी गोड पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीरातील साखरेची पातळी वाढते. याचा परिणाम आपल्या झोपेवर होतो. परिणामी आपल्या झोपेच्या चक्रात बिघाड होऊन आपल्याला वेळेवर झोप येत नाही. रात्रीच्या जेवणात डाळ-भात आणि चपातीचा समावेश आवर्जून करावा. हे अन्न आरोग्यासाठी चांगले आणि लाईट फुड देखील असते. परंतु रात्रीच्या जेवणाच्या वेळी आहारात साखरेचे प्रमाण टाळा. दुपारच्या जेवणात साखर खाणे फायदेशीर असते परंतु रात्रीच्या जेवणात गोड पदार्थ खाल्ल्याने आपल्याला नैसर्गिकरित्या येणाऱ्या झोपेत अनेक समस्या उद्भवतात. 


  
४.  झोपण्याआधी अतिप्रमाणात पाणी पिणे :- फक्त रात्रीच नाही तर दिवसभर स्वतःला हायड्रेटेड ठेवणे खूप गरजेचे असते. पण म्हणून रात्री झोपण्याआधी अति प्रमाणात पाणी पिणे चुकीचे आहे. झोपायच्या आधी जास्त पाणी प्यायल्याने रात्रीच्या वेळी वारंवार लघवी करण्यासाठी जावे लागते. ज्यामुळे आपल्या झोपत व्यत्यय येऊ शकतो. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपले शरीर नैसर्गिकरित्या शरीरातील लघवीचे उत्पादन कमी करते, यामुळे आपल्याला वारंवार लघवीसाठी न जाता कित्येक तास सलग शांत झोपता येते. याउलट जर आपण झोपायच्या आधी भरपूर प्रमाणात पाणी प्यायलो, तर आपले शरीर लघवी तयार करत राहील. ज्यामुळे आपल्याला वारंवार उठून लघवीला जावे लागेल. यासाठी झोपायच्या २ तास आधी पाणी किंवा इतर द्रव पदार्थ पिणे टाळा. परंतु दिवसभरात आपण भरपूर पाणी पीत आहोत याची खात्री करा.

५. झोपायच्या आधी स्क्रिन पाहू नका :- झोपायच्या १ तास आधी टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या स्क्रिन पाहणे टाळा. आपल्या शरीरातील मेलाटोनिन नावाचा हार्मोन्स हा आपल्या झोपेचे नियमन करतो. आपल्याला व्यवस्थित झोप येण्यासाठी हा हार्मोन्स फारच महत्वाचा असतो. टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या स्क्रिनमधून एक प्रकारच्या निळ्या रंगांचे प्रकाश उत्सर्जित करत असतात. या निळ्या रंगांचे रेज आपल्या शरीरातील मेलाटोनिन हार्मोन्सचे उत्पादन करण्याचे थांबवतात. परिणामी झोप लागणे कठीण होऊन झोपेची पद्धत विस्कळीत होऊ शकते.

Web Title: Avoid 5 mistakes while sleeping at night, you will wake up early in the morning - you will sleep well - you will feel fresh all day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.