Lokmat Sakhi >Social Viral > नॉनस्टिक भांड्यांवरील कोटिंग निघतेय ? तुम्हीसुद्धा करत नाहीत ना या ५ चुका, भांड्यांवरचे कोटिंग होईल खराब...

नॉनस्टिक भांड्यांवरील कोटिंग निघतेय ? तुम्हीसुद्धा करत नाहीत ना या ५ चुका, भांड्यांवरचे कोटिंग होईल खराब...

How to Clean Nonstick Pans So They Last for Years : नॉनस्टिक भांडी घासताना आपण हमखास काही चुका करतो ज्यामुळे ही भांडी खराब होऊन जास्त काळ टिकत नाहीत...त्यांवर सोपे उपाय पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2023 08:06 PM2023-08-30T20:06:09+5:302023-08-30T20:27:35+5:30

How to Clean Nonstick Pans So They Last for Years : नॉनस्टिक भांडी घासताना आपण हमखास काही चुका करतो ज्यामुळे ही भांडी खराब होऊन जास्त काळ टिकत नाहीत...त्यांवर सोपे उपाय पाहा...

Avoid these 5 mistakes to make your non-stick pans last longer. | नॉनस्टिक भांड्यांवरील कोटिंग निघतेय ? तुम्हीसुद्धा करत नाहीत ना या ५ चुका, भांड्यांवरचे कोटिंग होईल खराब...

नॉनस्टिक भांड्यांवरील कोटिंग निघतेय ? तुम्हीसुद्धा करत नाहीत ना या ५ चुका, भांड्यांवरचे कोटिंग होईल खराब...

स्वयंपाक घरात काळाप्रमाणे भांडी बदलत गेली. अगदी सुरुवातील मातीची, मग लोखंडाची, मग तांब्या - पितळेची, त्यानंतर आला स्टीलचा जमाना, आणि आता सध्या सुरु आहे तो नॉनस्टिकचा काळ. स्वयंपाकघरात कोणताही पदार्थ बनवताना तो भांड्याला चिकटून बसण्याची समस्या गृहिणींना सतावू लागली. अशावेळी ही समस्या दूर करण्यासाठी नॉनस्टिक भांड्यांचा वापर अधिक मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. नॉनस्टिक भांडी वापरण्याचा एक नवा ट्रेंडच सुरु झाला, या भांड्यांचा वापर केल्याने पदार्थ भांड्याच्या तळाशी चिटकायचे बंद झाले. एवढंच नव्हे, तर हे पदार्थ चिकटू नये म्हणून जास्तीचे भसाभसा तेल चोपडण्याची देखील आवश्यकता राहिली नाही. कमी तेल लागत असल्यामुळे सध्याच्या कॅलरीज जपण्याच्या काळातही अशा नॉनस्टिक भांड्यांची गरज वाढत गेली. 

नॉनस्टिक भांडयांना स्वच्छ करताना त्यांची विशेष काळजी घेतली नाही तर ती भांडी खराब होतात. अशी भांडी वापरण्यायोग्य न राहता खराब झाल्यामुळे त्यांचा काहीच वापर करता येत नाही. नॉनस्टिक भांडी स्वच्छ करताना आपण हमखास काही चुका करतो ज्यामुळे ही भांडी खराब होऊन जास्त काळ टिकत नाहीत. नॉनस्टिक भांड्यांवरील कोटिंग टिकून रहावे व भांडी दिर्घकाळ चांगली (Do THIS to Make Your Non-Stick Pans Last Longer) नव्यासारखी रहावीत यासाठी हमखास होणाऱ्या चुका लक्षात घेऊन त्यावरील उपाय समजून घेऊयात(Avoid these 5 mistakes to make your non-stick pans last longer).

नॉनस्टिक भांडी स्वच्छ करताना होणाऱ्या चुका टाळा :- 

चूक १ : नॉनस्टिक भांडी गरम असतानाच पाण्याखाली धुणे. 

उपाय :- नॉनस्टिक भांडी गरम असतानाच पाण्याखाली धुणे ही अतिशय चुकीची पद्धत आहे. नॉनस्टिक भांडी लगेच गॅस वरुन उतरवून गरम असतानाच पाण्याखाली धुतल्याने खराब होतात. नॉनस्टिक भांडी गरम असतानाच त्यांना पाण्याने धुतले तर त्यांवरील कोटिंग खराब होऊन ही भांडी वापरण्यायोग्य राहत नाहीत. नॉनस्टिक भांडी गॅसवरुन उतरवून सर्वप्रथम संपूर्णपणे गार होऊ द्यावीत. त्यानंतरच, ही भांडी पाण्याचे स्वच्छ धुवून घ्यावीत.  

बाथरुममधील शॉवरला गंज चढलाय ? ४ टिप्स - गंज निघेल चटकन आणि शॉवर होईल चकाचक...

चूक २ : नॉनस्टिक भांडी खरेदी करताना त्यावरील कोटिंगचा दर्जा न पाहताच भांडी विकत घेणे. 

उपाय :- नॉनस्टिक भांडी ही किमतीने थोडी महाग असतात. ही नॉनस्टिक भांडी खरेदी करताना त्यावरील कोटिंगचा दर्जा हा उत्तम असावा. नॉनस्टिक भांड्यांवरील कोटिंगचा दर्जा पाहूनच मग ती विकत घ्यावीत. शक्यतो चांगल्या दर्जाचे कोटिंग असणारीच भांडी निवडावीत. नॉर्मल नॉनस्टिक कोटिंग असणारी भांडी निवडण्यापेक्षा मार्बल किंवा सिरॅमिक कोटिंग असणारी भांडी निवडावीत. त्यामुळे त्यावरचे कोटिंग दीर्घकाळ चांगले टिकून राहते. 

कितीही धुतले तरीही शर्टाची कॉलर, अंडरआर्म्स दिसतात मळके ? ५ सोपे उपाय... शर्ट दिसेल पांढराशुभ्र...

वॉशिंग मशिनमधे धुतलेले कपडे एकमेकांत अडकतात, खूप सुरकुत्या पडतात? १ सोपी ट्रिक- बघा जादू...

चूक ३ : नॉनस्टिक भांडी ठेवताना ती एकात एक घालून ठेवणे. 

उपाय :- आपण शक्यतो रॅकमधील जागा वाचावी यासाठी काही भांडी एकात एक घालून ठेवतो.  नॉनस्टिक भांडी ठेवताना ती एकात एक घालून ठेवणे चुकीचे ठरते. नॉनस्टिक भांडी एकात एक घालून ठेवल्याने त्यावरचे कोटिंग खराब होऊ शकते. या भांड्यांचे कोटिंग खराब झाल्यामुळे ही भांडी नंतर वापरण्यायोग्य राहत नाहीत. याउलट जर जागेअभावी आपण ही भांडी एकात एक ठेवणार असाल तर दोन भांड्यांच्यामध्ये रबरी सिलिकॉन लायनर ठेवून मगच त्यावर दुसरे भांडे ठेवावे. यामुळे नॉनस्टिक भांड्यांचे कोटिंग खराब होत नाही. 

नॉनस्टिक भांड्यांचं कोटिंग भरपूर दिवस टिकावं म्हणून ५ टिप्स, भांडी राहतील वर्षानूवर्षे चांगली...

नॉनस्टिक भांडी घासताना हमखास होणाऱ्या ३ चुका, भांड्यांचे जाते कोटिंग आणि पैसे वाया...

चूक ४ : नॉनस्टिक भांड्यातील पदार्थ ढवळण्यासाठी स्टीलच्या चमच्यांचा वापर करणे.  

उपाय :-  नॉनस्टिक पॅन्स हे एका वेगळ्या विशेष कोटिंग पासून तयार केलेले असतात. त्यामुळे त्यांचे कोटिंग खराब होऊ नये म्हणून अशा भांड्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. नॉनस्टिक पॅन्सचे कोटिंग खराब होऊ नये म्हणून अन्नपदार्थ चमच्याने ढवळताना स्टीलचा चमचा वापरु नये, यामुळे पॅनवर चरे पडून कोटिंग खराब होण्याची शक्यता असते. हे कोटिंग खराब होऊ नये म्हणून शक्यतो नॉनस्टिक पॅन्समधील अन्नपदार्थ ढवळताना लाकडी किंवा सिलीकॉनच्या चमच्यांचा वापर करावा. 


चूक ५ : नॉनस्टिक भांडी स्वच्छ करण्यासाठी स्क्रबर किंवा तारेच्या घासणीचा वापर करणे. 

उपाय :-  नॉनस्टिक भांडी स्वच्छ करण्यासाठी स्क्रबर किंवा तारेच्या घासणीचा वापर करु नये. यामुळे भांडी खराब होण्याची शक्यता असते. नॉनस्टिक भांडी जर आपण स्क्रबर किंवा तारेच्या घासणीचा वापर करुन घासली, तर त्यावरचे कोटिंग निघू शकते. अशा भांड्यांवरील कोटिंग निघून गेल्यामुळे हळुहळु या भांड्यांच्या तळाशी अन्नपदार्थ चिकटून बसतात. असे होऊ नये म्हणून, भांड्यांवरील कोटिंग टिकवून ठेवण्यासाठी त्यांना स्क्रबर किंवा तारेच्या घासणीने घासू नये.

Web Title: Avoid these 5 mistakes to make your non-stick pans last longer.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.