Join us  

दूध पिता पिता दगावलं तान्हं बाळ, व्हायरल बातमी : स्तनपान करताना आईने काय काळजी घ्यायला हवी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2024 5:34 PM

Baby dies after mom falls asleep while breastfeeding : तान्ह्या बाळाला योग्य प्रकारे स्तनपान करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.

आईचं दूध बाळासाठी अमृतच (BreastFeeding). किमान सहा महिने बाळाला आईच्या दुधाशिवाय दुसरं काहीच देऊ नये, असं तज्ज्ञ सांगतात आईचं दूध बाळाच्या वाढीसाठी पौष्टीक मानलं जातं (Baby Dies). पण जर याच दुधामुळे बाळाचा मृत्यू झाला तर? बाळाला दूध पाजताना चूक झाली आणि दुर्देवानं बाळ दगावलं अशी एक दु:खद घटना आहे (Social Viral). या व्हायरल घटनेची अर्थात चर्चा आहे, पण त्यामुळे तान्ह्या बाळाला दूध पाजताना किती काळजी घ्यायला हवी हा मुद्दा पण विचार करण्यासारखा आहे(Baby dies after mom falls asleep while breastfeeding).

एक हृदयद्रावक घटना इंग्लंडमध्ये (England) घडली आहे. एव्हलिन असं मृत बाळाचं नाव आहे. लीड्स रुग्णालयात बाळाचा जन्म झाला. डिलीव्हरीनंतर आई आणि बाळ हेल्दी असल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आलं. घरी गेल्यानंतर आईने बाळाला दूध पाजलं. मात्र, दुसऱ्याच दिवशी बाळाचा दूध पीतपीताच मृत्यू झाला. आई बाळाला झोपून दूध पाजत होती.

बाळांतपणानंतर आईपण दमली होती. बाळाला दूध पाजत असतानाच तिला झोप लागली. काही मिनिटांनी तिला जाग आली, तेव्हा बाळाचे हृदयाचे ठोके थांबले होते. बाळाचे श्वासोच्छवासही थांबले होते, शिवाय बाळ हालचालही काही करत नव्हते. तत्काळ बाळाला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दूध पितापिता बाळा गुदमरलं असावं त्यानं बाळ दगावलं असल्याचा उल्लेख बातम्यांमध्ये दिसतो.

कोण म्हणतं फक्त बिट खाऊन रक्त वाढतं? खा ‘हे’ ५ पदार्थ, हिमोग्लोबिन वाढेल लवकर

स्तनपान करताना आईने कोणती काळजी घ्यावी?

- बाळाला स्तनपान करताना आईने केस बांधून ठेवावेत. त्यामुळे दूध पिताना मुलाच्या तोंडात केस जात नाहीत. बाळांना झोपून दूध पाजू नये. झोपून दूध पाजत असल्यास पूर्ण खबरदारी घ्यावी. ते तंत्र शिकून घ्यावे.

आलिया भट सांगते, सहा तास वॉशरुमला जाता आलं नाही! मात्र तासंतास लघवीला न जाणं घातक कारण..

- स्तनपान करताना बाळाची मान आपल्या हातात धरा. ज्यामुळे बाळाला दूध पिताना आधार मिळेल. याशिवाय आईने बाळाला दूध पाजण्यापूर्वी स्तन स्वच्छ करावेत.

- बऱ्याच वेळा बाळाला दूध पाजल्यावर लगेचच बेडवर ठेवलं जातं. पण यामुळे बाळाला त्रास होऊ शकते. ढेकर नीट काढावा.स्तनपान तज्ज्ञांचा सल्ला घेऊन बाळाला नीट दूध पाजणं शिकून घ्यावं म्हणजे नव्या आईलाही स्तनपानाचा ताण येत नाही.

 

टॅग्स :जागतिक स्तनपानसोशल व्हायरलइंग्लंड