सोशल मीडियावर प्राण्यांचे एकापेक्षा एक व्हिडिओज व्हायरल होत असतात. तर दुसरीकडे हत्तींचे भयंकर रूपही पाहायला मिळत आहे. हत्तीच्या रागाला सगळेच घाबरतात. कारण हत्ती इतके शक्तिशाली असतात की त्यांना राग आला तर ते कोणाचा तरी जीव घेऊ शकतात आणि मोठे नुकसान करू शकतात पण हत्ती तितकेच प्रेमळही असतात. (Baby elephant climbed on man body fighting and tried to crushes him then this happened see viral video)
सध्या सोशल मीडियावर हत्तीच्या पिल्लाचा एक धोकादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हत्तीच्या पिल्लाने रागाच्या भरात काय केले ते पाहून कोणाचीही तब्येत बिघडेल. हा व्हिडीओ बघायला मजेशीर आहे, पण थोडी चूक झाली तर कुणाचा जीवही जाऊ शकतो. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक माणूस हत्तीच्या बाळासोबत खेळताना दिसत आहे. खेळत असताना हत्तीचे बाळ त्या व्यक्तीच्या अंगावर आणि त्याला चिरडण्याचा प्रयत्न करते.
व्हिडिओ पाहिल्यावर असे दिसते की हत्तीचे बाळ त्या व्यक्तीला मिठी मारण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्या व्यक्तीचा चेहरा पाहून असा अंदाज लावता येतो की, हत्तीच्या या कृत्याचा त्याला त्रास होत आहे. काही वेळानंतर, ती व्यक्ती तिला वरून काढून टाकण्यात यशस्वी होते आणि त्याला प्रेमाने मिठी मारते.
थंडीत शिंगाडा खाल तर गॅस, एसिडिटीसह ७ आजारांपासून राहाल लांब; हे आहेत गुणकारी फायदे
हा व्हिडिओ तुफआन व्हायरल होत असून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर nature आणि animals_being_epic या दोन्ही पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 16 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर लोक खूप कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले - त्या व्यक्तीला हत्तीच्या पिल्लाचे हे कृत्य आवडले नाही तर दुसऱ्याने लिहिले - दोघे कुस्ती लढत आहेत.