Lokmat Sakhi >Social Viral > व्हायोलिन वाजवणाऱ्या महिलेला चिमुकलीची दिलखुलास दाद; पाहा व्हिडिओ , तुम्हीही म्हणाल वाह...

व्हायोलिन वाजवणाऱ्या महिलेला चिमुकलीची दिलखुलास दाद; पाहा व्हिडिओ , तुम्हीही म्हणाल वाह...

लहानगीच्या निरागसतेची आणि नॅचरल प्रतिक्रियेचे नेटीझन्सकडून जोरदार कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2022 05:19 PM2022-06-14T17:19:54+5:302022-06-14T17:25:29+5:30

लहानगीच्या निरागसतेची आणि नॅचरल प्रतिक्रियेचे नेटीझन्सकडून जोरदार कौतुक

baby Girl's heartfelt admiration for the woman playing the violin; Watch the video, you too will say wow ... | व्हायोलिन वाजवणाऱ्या महिलेला चिमुकलीची दिलखुलास दाद; पाहा व्हिडिओ , तुम्हीही म्हणाल वाह...

व्हायोलिन वाजवणाऱ्या महिलेला चिमुकलीची दिलखुलास दाद; पाहा व्हिडिओ , तुम्हीही म्हणाल वाह...

Highlights नेटीझन्सनेही या व्हिडिओचे सोशल मीडियावर खूप कौतुक केले आहे...निर्मळ आणि निरागसता काय असते हे पाहण्यासाठी व्हिडिओ नक्की पाहा

लहान मुले अतिशय निरागस असतात, त्यामुळे त्यांची प्रत्येक गोष्ट एकदम खरी आणि आतून आलेली असते. आपण जसजसे मोठे होतो तसे आपल्याला खरे-खोटे किंवा ठरवून वागणे जमायला लागते. मात्र लहान मुलांच्या सगळ्याच भावना इतक्या नैसर्गिक असतात की त्यांच्या मनात जे आहे ते त्यांच्या कृतीतून समोर येते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमधील लहानग्या मुलीची प्रतिक्रिया पाहून उपस्थित आणि नेटीझन्स थक्क झाले आहेत. एका व्हायोलिन वाजवणाऱ्या कलाकार महिलेला तिनी दिलेली दिलखुलास दाद सर्वांचीच मने जिंकून घेणारी ठरत आहे. 

इन्स्टाग्रामवर व्हायोलिन बाय मेल या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ ऑस्ट्रेलियातील (Australia) सिडनी (Sydney) येथील असून त्यामध्ये व्हायोलिनवादक (Violist) मेलिसा वोयियस एक छानसा वन पीस घालून एका कार्यक्रमात मनसोक्त व्हायोलिन वाजवत आहे. तिच्या या वादनाने उपस्थित असलेले सगळेच दंग झाल्याने या व्हिडिओमध्ये दिसते. याठिकाणी उपस्थित असलेली एक लहान मुलगीही ती वाजवत असलेले व्हायोलिन अतिशय मन लावून ऐकत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. तिचे वादन झाल्यावर ही लहानगी मुलगी धावतच तिच्याजवळ येते आणि अतिशय प्रेमाने तिला बिलगते. हा क्षण अतिशय भावूक करणारा आहे. 

याचाच अर्थ तिचे वादन अतिशय चांगले झाल्याचे या चिमुकलीला या वादकाला सांगायचे असावे. पांढऱ्या फ्रॉकमध्ये असलेली ही लहान मुलगी इतकी गोंडस आहे की तिची रिअॅक्शन पाहून ती वादकही खूप खूश झाल्याचे पाहायला मिळते. मेलिसा तिच्या पाठीवर अतिशय प्रेमाने हात फिरवते आणि तिला जवळही घेते. मात्र या लहानग्या मुलीने दिलेली प्रतिक्रिया सर्वात सुंदर प्रतिक्रिया असल्याचे दिसते. हा क्षण पाहून उपस्थित लोकही भारावून जातात. त्याचप्रमाणे नेटीझन्सनेही या व्हिडिओचे सोशल मीडियावर खूप कौतुक केले आहे. या व्हिडिओला ११ हजारांहून अधिक लाईक्स आले असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. 

Web Title: baby Girl's heartfelt admiration for the woman playing the violin; Watch the video, you too will say wow ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.