एखाद्या चित्रपटात किंवा मालिकेत शोभेल अशीच ही गोष्ट... साधी फुगे विकणारी पोरं... पण तिच्यातला चार्म एका फोटोग्राफरने हेरला आणि बघता बघता फुगेवाली तरुणी (balloon seller girl) चक्क इंटरनेट स्टार (internet star) म्हणून ओळखली जाऊ लागली.. पोटाची खळगी भरण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी उभे राहून फुगे विकणाऱ्या किस्बूची (Kisboo) ही कहाणी...
किस्बू.... १८- १९ वर्षांची तरुण मुलगी.. ही मुळची राजस्थानी. पण मागच्या अनेक वर्षांपासून ती केरळमध्येच राहते. घर चालविण्यासाठी ती फुगे विकते. एकदा नेहमीप्रमाणे ती तिचे काम करत होती.. कोणी फुगे घेईल का म्हणून मोठ्या आशेने अवतीभोवती पाहत होती. त्यावेळीच वेडिंग फोटोग्राफर अर्जून कृष्णन यांनी तिला हेरलं. तिची देहबोली, बोलका चेहरा आणि तेवढेच भावपूर्ण डोळे त्यांना आवडले. त्यांना तिचा चेहरा अतिशय फोटोजेनिक वाटल्याने त्यांनी तिच्या नकळत तिचे फोटो काढले. त्यानंतर त्यांनी हे फोटो किस्बू आणि तिच्या आईला दाखवले. त्यांनाही ते खूपच आवडले.
यानंतर ते फोटो अर्जूनच्या मित्राने पाहिले. ते सोशल मिडियावर शेअर केले. त्या फोटोंमध्ये एवढा चार्म होता की सोशल मिडियावर ते फोटो प्रचंड व्हायरल झाले आणि त्यावर अक्षरश: लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला. म्हणूनच हा प्रतिसाद पाहून अर्जून यांनी किस्बूचा मेकओव्हर केला आणि त्यानंतर तिचे एकदम प्रोफेशनल फोटो शूट केले. photoman_official या इन्स्टाग्रामवर (instagram) पेजवर हे फोटो शेअर करण्यात आले असून त्याला ''From the street of andalur to peoples heart. And that smile in her face after the make over #KISBU'' अशी कॅप्शन देण्यात आली आहे. या फोटोंमुळे सध्या किस्बू केरळमध्ये चांगलीच पॉप्यूलर आहे..