Lokmat Sakhi >Social Viral > बाबांचं ६० वर्ष जुनं पासबूक सापडलं अन् लेक करोडपती झाला; रातोरात नशीब पालटलं

बाबांचं ६० वर्ष जुनं पासबूक सापडलं अन् लेक करोडपती झाला; रातोरात नशीब पालटलं

Fathers bank book made son millionaire : वडिलांचे ६० वर्षे जुने पासबुक शोधून एका मुलाने करोडो रुपये कमावले आहेत. दक्षिण अमेरिकेतील चिली येथे राहणारे एक्सेल हिनोजोसाचे वडील 1960 आणि 70 च्या दशकात घर घेण्यासाठी पैसे गोळा करत होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 02:39 PM2022-11-07T14:39:44+5:302022-11-07T14:55:04+5:30

Fathers bank book made son millionaire : वडिलांचे ६० वर्षे जुने पासबुक शोधून एका मुलाने करोडो रुपये कमावले आहेत. दक्षिण अमेरिकेतील चिली येथे राहणारे एक्सेल हिनोजोसाचे वडील 1960 आणि 70 च्या दशकात घर घेण्यासाठी पैसे गोळा करत होते.

Bank passbook after 60 years the fathers bank book made the son a millionaire | बाबांचं ६० वर्ष जुनं पासबूक सापडलं अन् लेक करोडपती झाला; रातोरात नशीब पालटलं

बाबांचं ६० वर्ष जुनं पासबूक सापडलं अन् लेक करोडपती झाला; रातोरात नशीब पालटलं

आपण सगळेच बँकेची महत्वाची कागदपत्र सांभाळून ठेवत असतो. बँकांच्या अनेक योजना तुम्हाला पैसे वाचवण्यासाठी आणि पैसा वाढवण्यासाठी मदत करतात. नुकतीच अशी एक घटना समोर आली आहे ज्यात बँकेच्या 60 वर्षांपूर्वीच्या पासबुकने एका मुलाला करोडपती बनवले आहे. जर तुम्ही बँकेत काही पैसे ठेवले  आणि तुम्हाला 60 वर्षांनंतर आठवले की काही पैसे बँकेत पडून आहेत. तर हे किती आनंददायी असू शकते. (Bank passbook after 60 years the fathers bank book made the son a millionaire)

वडिलांचे ६० वर्षे जुने पासबुक शोधून एका मुलाने करोडो रुपये कमावले आहेत. दक्षिण अमेरिकेतील चिली येथे राहणारे एक्सेल हिनोजोसाचे वडील 1960 आणि 70 च्या दशकात घर घेण्यासाठी पैसे गोळा करत होते. १६३ डॉलर (१२,६८४ रुपये) जमा केले होते. 
हिनोजोसाच्या वडिलांनी ही रक्कम क्रेडिट युनियन बँकेत ठेवली होती जी आता कार्यरत नाही. वडिलांच्या निधनानंतर हे पासबुक एका पेटीत ठेवण्यात आले होते. (Fathers bank book made son millionaire)

एके दिवशी अचानक हिनोजोसा काहीतरी शोधत असताना त्याच्या वडिलांच्या बॉक्समध्ये हे पासबुक दिसले. हे पासबुक निरुपयोगी वाटले तरी हिनोजोसाला बँकेत जमा केलेल्या रकमेवर त्याची स्टेट गॅरंटी असे शब्द वाचायला मिळाले. त्यानंतर, व्याजदर आणि महागाई पाहता, त्याला वाटले की त्याच्या वडिलांनी वाचवलेली रक्कम आता $1.2 दशलक्षच्या जवळपास पोहोचली असेल.

हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर हिनोजोसाला त्याच्या वडिलांचे पासबुक सादर करण्यास सांगितले होते. हिनोजोसाला  वडिलांच्या जुन्या बॉक्समध्ये पासबुक सापडले. ही रक्कम राज्यानं हमी दिल्यानं परत मिळायला हवी. या दाव्याला न्यायालयात पुष्टी मिळाली. भारतीय रुपयात ही रक्कम 9.33 कोटी रुपये होती. ही रक्कम राज्य हमी म्हणून परत मिळावी, असा दावा हिनोजोसा यांनी सरकारकडे केला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले.

सुप्रीम कोर्टात हिनोजोसा यांनी हा पैसा त्यांच्या कुटुंबाचा असल्याचे सांगितले आहे. त्याच्या वडिलांनी कष्टाने ते पैसे जमा केले आहे आणि त्यावर राज्य हमी असेल तर ती परत केलीच पाहिजे, कोर्टात हिनोजोसाच्या बाजूने अनेक निर्णय आले. यानंतर सरकारने सांगितले की, बँक पासबुकचे भविष्य आता अंतिम न्यायालय ठरवेल. हिनोजोसाला लवकरच सुमारे 10 कोटींची रक्कम मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Bank passbook after 60 years the fathers bank book made the son a millionaire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.