Join us

बापरे, काय डेंजर डेअरिंगबाज पोरगी, अजगराशी खेळतेय बिनधास्त, पाहा व्हिडीओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 13:28 IST

इतक्या लहान वयात कुत्रा, मांजर नाही तर चक्क अजगराशी खेळते ही चिमुकली

ठळक मुद्देअजगरावर पहुडणारी ही लहान मुलगी तुम्ही पाहिली का? खेळण्यांशी नाही ही चिमुकली खेळते भल्यामोठ्या अजगराशी

लहान मुलांना आपण खेळण्यासाठी खेळणी देतो, यामध्ये सॉफ्ट टॉइज, बॉल, मॅकॅनोचे वेगवेगळे प्रकार असतात. मुलींसाठी बार्बी आणि एकाहून एक भन्नाट बाहुल्याही बाजारात उपलब्ध असतात. याशिवायही लहान मुले घरातील वस्तूंशी खेळतात. घरात एखादी पाळीव मांजर किंवा कुत्रा असेल तर त्या प्राण्यांशीही या लहानग्यांची चांगली दोस्ती होते आणि ते त्यांच्याशी छान खेळतात. पण एक लहान मुलगी हे सगळे सोडून एका अवाढव्य अजगराशी खेळत आहे. तिचा हा अजगराशी खेळताना व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

ही गोंडस मुलगी लाल टिशर्ट आणि पँट घालून या भल्या मोठ्या अजगराशी खेळताना पाहून आपल्या काळजाचा ठोका चुकू शकतो. सुरुवातीला ही मुलगी तिच्या घराबाहेर खेळत असते. नंतर एक अजगर तिच्या अगदी पायाजवळ येते तरीही ती मस्त हसत त्याच्याकडे पाहात असते. इतकेच नाही तर नंतर चक्क ती त्याच्या तोंडापाशी हात लावून आपण एखाद्या मित्र-मैत्रीणीशी खेळू त्याप्रमाणे खेळताना दिसते. नंतर ही चिमुकली चक्क या अजगराच्या वेटोळ्यांमध्ये मस्त पहुडलेलीही पाहायला मिळते. साप म्हटले की भल्याभल्यांच्या काळजाचा ठोका चुकतो पण ही लहान मुलगी अगदी निवांतपणे त्याच्याशी खेळताना दिसते.

स्नेक वर्ल्ड नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडियो पोस्ट कऱण्यात आला असून एक लाखाच्या जवळपास लोकांनी तो पाहिला आहे. तसेच अनेकांनी यावर आश्चर्य व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. आता अजगराशी खेळणारी ही लहान मुलगी कोणत्या देशातील आहे हे माहित नसले तरी या मुलीचे डेअरिंग खरंच कौतुकास्पद ठरत आहे. हे अजगर माणसाळलेले असले तरीही अशाप्रकारे इतक्या लहान वयात भल्या मोठ्या अजगराशी खेळणे ही गोष्ट कौतुकास्पद आहे.

टॅग्स :सोशल व्हायरलइन्स्टाग्राम