Lokmat Sakhi >Social Viral > देखणी नाजूकसाजूक बार्बी बदलली, ही नवीन डाऊन सिंड्रोम बार्बी सांगतेय...

देखणी नाजूकसाजूक बार्बी बदलली, ही नवीन डाऊन सिंड्रोम बार्बी सांगतेय...

Mattel Breaks Barriers With First-Ever Barbie Doll With Down Syndrome : बार्बी म्हणजे नाजूक साजूक सुंदर अशी प्रतिमा होती, पण काळानुरुप बदलत बार्बीने आता एक नवीन पुढचं पाऊल टाकलं आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2023 04:48 PM2023-04-27T16:48:17+5:302023-04-27T17:05:02+5:30

Mattel Breaks Barriers With First-Ever Barbie Doll With Down Syndrome : बार्बी म्हणजे नाजूक साजूक सुंदर अशी प्रतिमा होती, पण काळानुरुप बदलत बार्बीने आता एक नवीन पुढचं पाऊल टाकलं आहे.

Barbie becomes more diverse and inclusive, first ever doll with Down Syndrome launched | देखणी नाजूकसाजूक बार्बी बदलली, ही नवीन डाऊन सिंड्रोम बार्बी सांगतेय...

देखणी नाजूकसाजूक बार्बी बदलली, ही नवीन डाऊन सिंड्रोम बार्बी सांगतेय...

लहान मुलींना त्यांच्या सगळ्या खेळण्यांमध्ये सर्वात जास्त आकर्षण असत ते बाहुलीच. लहान मुलींना विशेषतः बाहुलीसोबत खेळायला जास्त आवडत. या बाहुलींमध्ये जर ती बार्बी डॉल असेल तर मग काही विचारुच नका. लहानांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत बाहुलीच नाव काढलं की आपल्या डोळ्यासमोर थेट बार्बी डॉलच येते. ही छोटीशी एखाद्या मॉडेलसारखी दिसणारी बाहुली अगदी जगभर लोकप्रिय आहे. तिचे गुलाबी गाल, सोनेरी केस, छोटेसे हलवता येणारे हात - पाय, पाणीदार डोळे, गुलाबी ओठ, स्लिम ट्रिम दिसणारी, वेगवेगळ्या स्वरुपातील कपडे परिधान केलेल्या या बार्बी डॉलची आकृती आपल्या सगळ्यांच्याच नजरेत एकदम पक्की बसली आहे.    

लहान मुलींमध्ये प्रचंड क्रेझ असलेल्या Barbie चं आता एक रूप Down's syndrome मध्ये देखील पाहता येणार आहे. तिचं हे नवं रुप सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरलं आहे. कारण, Mattel या खेळणी- बाहुले- बाहुल्या तयार करणाऱ्या कंपनीनं अमेरिकेतील National Down Syndrome Society च्या मदतीनं थेट  Down Syndrome असणाऱ्या बालकांसाठी ही बार्बी तयार केली आहे. बार्बी ची रेंज अधिक व्यापक करण्यासाठी हे नवं रूप बाजारात आणलं आहे. ही नवी डॉल Mattel Barbie Fashionistas line चा पार्ट असणार आहे. ज्याचा उद्देश सौंदर्याकडे पाहण्याची दृष्टी बदलण्यासोबतच या शारिरीक व्यंगाकडे कलंक म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन देखील बदलला जाणार आहे. नव्या स्वरुपातील बार्बी डॉल बनवताना कंपनीने National Down Syndrome Society च्या मदतीने तिचा आकार, फीचर, कपडे आणि पॅकेजिंग केल्याचं सांगितलं आहे. यामुळे ती अधिक प्रकर्षाने Down syndrome व्यक्तीचं प्रतिनिधित्व करू शकणार आहे(Barbie becomes more diverse and inclusive, first ever doll with Down Syndrome launched).

डाऊन सिंड्रोम बार्बीच नव रुपं नेमकं आहे तरी कसं... 

विशेष बालकांच्या अनुषंगानं या नव्या बार्बीमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये बार्बीची उंची आणि तिची अंगकाठी लगेचच लक्ष वेधत आहे. या नव्या बार्बीची उंची कमी ठेवण्यात आली आहे. नव्या बार्बीच्या चेहऱ्याचा आकार गोलाकृती असून, बदामाच्या आकाराचे डोळे तिला देण्यात आले आहेत. लहानसे कान आणि लहानसं नाक असं तिचं एकंदर रुप आहे. बाहुलीच्या तळहातावरही एकच रेष असून, विशेष बालकांमध्ये दिसणाऱ्या काही गुणांना अधोरेखित करण्यात आलं आहे. बार्बीला फुगीर बाह्यांचा, फुलपाखरं आणि फुलांची निळ्या पिवळ्या रंगाची नक्षी असणारा, एक फ्रॉक देण्यात आला आहे. हे रंग Down’s syndrome जनजागृतीचं प्रतीक आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे कंपनीकडून ही नवी बार्बी साकारताना अनेक बारकावे अचूकपणे टीपण्यात आले आहेत. ज्याचं संपूर्ण जगातून कौतुक होताना दिसत आहे. 

केस विंचरण्यासाठी प्लास्टिक नाही लाकडी कंगवा वापरा, केसांच्या समस्या चुकीचा कंगवा वापरल्याने वाढतात कारण...

NDSS च्या President & CEO यांची प्रतिक्रिया... 

डाऊन सिंड्रोम मध्ये काही जेनेटिक कंडिशन्स मुळे चेहर्‍याची ठेवण इतरांच्या तुलनेत वेगळी असते. शिकण्यामध्ये त्यांना अनेक अडथळे येऊ शकतात. Kandi Pickard,NDSS president and CEO यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये ' ही नवी बार्बी रिमाईंडर देईल की आपण power of representation ला कधीही कमी लेखू नये. समाजातील सार्‍या घटकांना आपण एकत्र घेऊन जाणार आहोत यासाठीचं हे पहिलं आणि मोठं पाऊल आहे. Down syndrome community चं प्रतिनिधित्त्व करणारी काही चिन्हं आणि पॅटर्न या डॉलच्या ड्रेस वर दिसणार आहेत. काही डाऊन सिंड्रोम असणार्‍या व्यक्ती orthotic sneakers वापरतात त्याचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

भूमी पेडणेकरने एका इव्हेण्टसाठी का घातला असेल ३४ वर्षे जुना ड्रेस? कोणती स्पेशल स्टाइल...

नेटकरी म्हणतात... 

नेटिझन्स कडून बार्बी डॉलच्या या रूपाला स्वीकारत अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद दिले आहेत. १९५९ साली जेव्हा ही डॉल बाजारात आली तेव्हा ती स्लीम, गोरीपान आणि हाय हिल्स मध्ये होती. पण २०१६ मध्ये, बाहुलीची विक्री कमी होत असताना, Mattel ने नवीन बाहुल्यांना अधिक समावेशक आणि त्यांच्या स्वरुपात वैविध्यपूर्ण बनवून बार्बीला अधिक वास्तववादी बनवले. बार्बीला २२ डोळ्यांचे रंग आणि २४ हेअरस्टाइलसह चार शरीर प्रकार आणि सात त्वचेच्या टोनमध्ये पुन्हा सादर करण्यात आले.

Web Title: Barbie becomes more diverse and inclusive, first ever doll with Down Syndrome launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.