लहान मुलींचं पहिलं खेळणं म्हणजे बाहुली (Barbie Doll). बाहुल्यांमध्ये बार्बी डॉल फार फेमस आहे. बार्बीसोबत मुली गप्पा मारत बसतात, तिची काळजी घेतात. बार्बीची क्रेझ फक्त मुलींमध्ये नसून, महिलांना देखील आहे (Social Viral). अतिशय नाजूक, निरागस डोळे असलेली ही बाहुली आपल्याजवळ असावी, असं जगातल्या प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. जसजसं बार्बीची क्रेझ वाढत गेली, तसतसं बार्बीमध्ये देखील नवनवीन प्रकार पाहायला मिळाले.
बार्बी काळानुरुप आणि सामाजिक जाणीवांनुसार बदलत गेली असंही दिसतं. आणि पुरेशी न बदलता तिने बायकांना एका विशिष्ट इमेजमध्ये बांधून घातलं असंही दिसतं. पण नुकतीच नवी बार्बी डॉल बाजारात आली, तिची थीम दिवाळी अशी आहे. दिवाळी थीम बार्बी डॉल, भारतीय पोशाखामध्ये सुंदर आणि तेजस्वी दिसत आहे. सध्या या बार्बीची सोशल मीडियात चर्चा आहे. ही भारतीय बार्बी दिसते कशी पाहा तरी..(Barbie launches its first-ever 'Diwali doll' in collaboration with Indian designer Anita Dongre; Here's how to avail it).
बार्बीची सुंदर दिवाळी थीम डॉल पाहिली का?
दिवाळीच्या खास निमित्ताने टॉय जायंट मॅटेलने, महिलांसाठी एक खास भेट आणली आहे. अलीकडेच कंपनीने भारतीय फॅशन डिझायनर अनिता डोंगरे यांच्या सहकाऱ्याने एक सुंदर दिवाळी बार्बी डॉल लॉन्च केली आहे. यंदाची दिवाळी ३१ ऑक्टोबरला साजरी होत असून, हा सण आणखी अविस्मरणीय बनण्याच्या उद्देशाने ही खास बाहुली लॉन्च करण्यात आली आहे असं कंपनीचं म्हणणं आहे.
ऐन तारुण्यात पायऱ्या चढताना दम लागतो - श्वास फुलतो? ५ गोष्टी; दम लागणं बंद - ताकद वाढेल
बार्बी डॉलचा भारतीय अवतार
दिवाळी थीम बार्बीला रंगीबेरंगी फ्लोरल कोटी वेस्ट, चोली टॉप आणि लेहेंगा स्कर्ट परिधान केलं आहे. 'मूनलाईट ब्लूम' या थीमवर ही बाहुली तयार करण्यात आली आहे. असे मॅटेलने बार्बीबद्दल वैशिष्ट्य सांगताना म्हटलं आहे.
तिच्या ड्रेसमधली फुलांची सजावटही सुंदर कोरलेली आहे. बार्बी अधिक सुंदर दिसावी म्हणून, तिच्या कानात चमचमते झुमकेही घातले आहे. शिवाय हातात सोन्याच्या बांगड्याही आहेत. या दागिन्यांमुळे बार्बी अधिक आकर्षक दिसत आहे.
अनिता डोंगरे म्हणतात, माझ्यासाठी ही बार्बी खास..
दिवाळी थीम डॉलबद्दल अनिता डोंगरे म्हणते, 'मी लहान असताना भारतात बार्बी उपलब्ध नव्हत्या, त्यामुळे मला ती विकत घेण्याची संधी मिळाली नाही. पण मी स्वतः बार्बी डिझाईन करणे हा एक अविश्वसनीय अनुभव आहे. ही बार्बी डॉल माझ्यासाठी खूप खास आहे. ती घरोघर पोहचेल याचा मला आनंद आहे.
भाजीसोबत फुकट मिळणारी 'ही' पानं वेट लॉससाठी बेस्ट; चमचाभर चटणी रोज खा; पोटाची चरबी झरकन घटेल
कशी खरेदी कराल दिवाळीची बार्बीची डॉल?
ही खास बाहूली ऑनलाइन किंवा अमेझॉनवर उपलब्ध आहे. बाहुलीची किंमत १,९९५ रुपये इतकी आहे.