Basmati Rice Bag: अमेरिकेतील एक महिला सध्या एका वेगळ्याच कारणानं सोशल मीडियावर चर्चेत आहे. ही महिला एका सलूनमध्ये खांद्यावर बासमती तांदळाची बॅग घेऊन दिसली. या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अमांदा जॉन मंगलाथिल नावाच्या महिलेनं इन्स्टाग्रॅाम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. महिलेची ही स्टाईल पाहून लोक या व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.
अमेरिकेत बासमती तांदळाची बॅग
हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या महिलेनं आपल्या पोस्टच्या कॅप्शनला लिहिलं की, 'अमेरिकेत काय ट्रेंड होत आहे, हे तुम्ही बघण्याची गरज आहे. तुम्ही हे हलक्यात घेऊ शकत नाहीत. भारतात हा ट्रेन्ड लो प्राइजमध्ये उपलब्ध आहे. यात बघू शकता महिलेच्या खांद्यावर एक ब्राउन रंगाची बॅग आहे. रॉयल, बासमती राइज'. महिलेच्या या पोस्टवर लोक अनेक मजेदार कमेंट्स करत आहेत. व्हिडीओ बघण्यासाठी इथे क्लिक करा.
मजेदार कमेंट्स
महिलेच्या पोस्टवर एका यूजरनं लिहिलं की, 'जर तुमच्याकडे बासमती बॅग असेल, तर गुच्चीची काय गरज आहे'. तर दुसऱ्यानं लिहिलं की, 'उप्स, मी अलिकडे बासमती राइसची बॅग फेकली. मी हे आधी फॉलो करायला हवं होतं'. तिसऱ्यानं लिहिलं की, 'तुम्हाला काहीतरी गैरसमज झालाय, विमलची बॅग ट्रेंडिंगमध्ये आहे'. तर चौथ्यानं लिहिलं की, 'चला आपल्या मित्राच्या वडिलांच्या दुकानावर जाऊ'.