थंडीत अंघोळ करायचं म्हटलं की भल्या भल्यांना घाम फुटतो. उन्हाळ्यात लोक घामाघूम झाल्यानं दिवसभरात २ ते ३ वेळा अंघोळ करतात पण हिवाळ्यात मात्र एकदा अंघोळ करायचाही कंटाळा येतो. अंघोळ करण्यासाठी गरम पाणीच हवं असतं. हिवाळ्यात थंड पाण्यानं अंघोळ करणं जीव धोक्यात घालण्यासारखं असतं. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये थंडीच्या दिवसात अंघोळ करण्यासाठी एका तरूणानं निंजा टेक्निकचा वापर केला आहे. ही टेक्निक खूपच मजेशीर आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला खूप हसू येईल.
व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता एक मुलगा बाथरूमध्ये अंघोळ करण्यासाठी उभा आहे. त्याच्यासमोर एक बादली ठेवली आहे आणि तो मगच्या साहाय्यानं पाणी काढत आहे पण हे पाणी तो शरीरावर न टाकता मागे टाकतो. दुसऱ्या खांद्यावरूनही तो अंगावर पाणी न टाकता मागे फरशीवर पाणी सांडतो. त्यानंतर तो फक्त २ बोटं पाण्यात बुडवतो आणि डोळे ओले करतो नंतर बाथरूमधून निघून खोलीत जातो.
अशी निंजा टेक्निक तुम्ही कधीही पाहिली नसेल. अंगावर एकही थेंब न सांडवता त्याची अंघोळ करून होते. ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @tololmeroket नावाच्या आयडीवरून हा मजेदार व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 21 सेकंदांचा हा व्हिडिओ 7 लाख 33 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 31 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे.