Lokmat Sakhi >Social Viral > बाथरूम, टॉयलेटमधल्या मगांवर मेणचट-काळा थर आलाय? ४ ट्रिक्स, स्वच्छ, नवेकोरे दिसतील मग

बाथरूम, टॉयलेटमधल्या मगांवर मेणचट-काळा थर आलाय? ४ ट्रिक्स, स्वच्छ, नवेकोरे दिसतील मग

Bathroom Mug Cleaning Tips : रोज रोज पाण्याच्या संपर्कात आल्याने याशिवाय साबणाचे हात लागून मग घाणेरडा, जूना दिसतो. तर काहीवेळा मगांवर काळे डाग पडतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 02:52 PM2023-10-30T14:52:14+5:302023-10-31T11:39:31+5:30

Bathroom Mug Cleaning Tips : रोज रोज पाण्याच्या संपर्कात आल्याने याशिवाय साबणाचे हात लागून मग घाणेरडा, जूना दिसतो. तर काहीवेळा मगांवर काळे डाग पडतात.

Bathroom Mug Cleaning Tips : Diwali Home Cleaning Tips How to Clean Bathroom Mug | बाथरूम, टॉयलेटमधल्या मगांवर मेणचट-काळा थर आलाय? ४ ट्रिक्स, स्वच्छ, नवेकोरे दिसतील मग

बाथरूम, टॉयलेटमधल्या मगांवर मेणचट-काळा थर आलाय? ४ ट्रिक्स, स्वच्छ, नवेकोरे दिसतील मग

बाथरूम आणि टॉयलेटमध्ये मगचा वापर फार आवश्यक असतो. एक दिवस मग सापडला नाही तर सगळी कामं अडून राहतात.  (Home Cleaning Hacks) रोज रोज पाण्याच्या संपर्कात आल्याने याशिवाय साबणाचे हात लागून मग घाणेरडा, जूना दिसतो. तर काहीवेळा मगांवर काळे डाग पडतात. (How to clean bathroom buckets and mugs) घरात कोणीही पाहूणे आल्यानंतर अशाप्रकारचे मग पाहून किळसवाणे वाटू शकते, तुम्ही घर खूप अस्वच्छ ठेवता अशी इमेज तयार होऊ शकते. (Diwali  Home Cleaning Tips)

प्लास्टीकच्या मगांवर लागलेला काळेपणा, माती साफ करण्याच्या सोप्या टिप्स पाहूया. ५० ते १०० रूपयांच्या आत नवीन मग मिळतात म्हणून बरेजण वारंवार नवीन मग विकत घेतात. (How to Clean Bathroom Mug) फक्त ५ मिनिटांत तुम्ही मेणचट, खराब दिसत असलेले मग चमकवू शकता. साफ-सफाई पटापट होण्यासाठी हे सोपे हॅक्स उपयोगी ठरतील. (Before Diwali House Cleaning Tips)

ब्लीच पावडरचा वापर

साफसफाईसाठी तुम्ही वेगवेगळ्या आर्टिफिशियल क्लिनर्सचा वापर करू शकता. बाथरूमचे घाणेरडे मग ब्लीच पावडरच्या मदतीने स्वच्छ करणं खूपच सोपं आहे. ही पावडर मगवर लावून काही वेळासाठी तसंच ठेवून द्या. नंतर रगडून  मग स्वच्छ करा. या सोप्या उपायाने मग चकचकीत दिसेल. 

दिवाळीची साफ-सफाई करताना नक्की घराबाहेर काढा ५ गोष्टी; सकारात्मकता-शांतता राहील घरी

कास्टिंग सोडा

मग चिकट, मेणचट झाला असेल तर तो साफ करण्यासाठी तुम्ही कास्टींग सोड्याचा वापर करू शकता. यासाठी कास्टींग सोडा आणि पाणी मिसळून त्याची पेस्ट तयार करा. नंतर ही पेस्ट मगच्या चारही बाजूंना लावा. त्यानंतर मग स्वच्छ धुवा. या उपायाने मग नव्यासारखा दिसेल. याव्यतिरिक्त तुम्ही घाण झालेला मग स्वच्छ करण्यसाठी टुथपेस्ट, बेकींग सोडा, व्हिनेगर, लिंबू या पदार्थांचा वापर करू शकता. 

टुथपेस्ट

तुमच्याकडे असलेली कोणतीही  टुथपेस्ट घेऊन त्यात बेकींग सोडा, व्हिनेगर आणि लिंबू मिसळा हे मिश्रण एकत्र करून त्यात ब्रश बुडवा आणि या पेस्टच्या साहाय्याने मग स्वच्छ घासून घ्या.  ५ ते १० मिनिटं तसंच ठेवल्यानंतर मग स्वच्छ पाण्याने धुवा.

भांड्याची मांडणी चिकट -कळकट झालीये? 5 टिप्स-स्टीलची मांडणी दिसेल नव्यासारखी, स्वच्छ

मग धुण्यासाठी तुम्ही शॅम्पूच्या पाण्याचाही वापर करू शकता किंवा कपड्यांचा साबण वापरात नसलेल्या ब्रशला लावून त्या ब्रशने मग स्वच्छ घासा आणि पाण्याने धुवा.  हे सोपे उपाय दिवाळीत घराची साफसफाई पटापट करण्यास मदत करतील. 

Web Title: Bathroom Mug Cleaning Tips : Diwali Home Cleaning Tips How to Clean Bathroom Mug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.