Join us  

आंघोळीच्या बादल्या मेणचट-कळकट झाल्या? ३ जबरदस्त ट्रिक्स; बादल्या होतील स्वच्छ-दिसतील चकचकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2024 5:13 PM

Bathroom Mug or Bucket Cleaning / Easy Tips : प्लास्टिकच्या बादल्या घासूनही स्वच्छ होत नसतील तर, ३ ट्रिक्सचा वापर करा..

घराची महिन्यातून दोनदा साफ सफाई करणं गरजेचं आहे (Cleaning Tips). आपण संपूर्ण घराची सफाई करतोच. पण बऱ्याचदा बाथरूम किंवा टॉयलेट साफ करण्याचे राहून जाते. बाथरूम साफ केलं तर, बादल्या घासायला वेळ मिळत नाही. बऱ्याच घरांमध्ये प्लास्टिकच्या बादल्या वापरण्यात येतात. प्लास्टिकच्या बादल्या आपण दररोज आंघोळीसाठी वापरतो (Bucket Cleaning). किंवा त्याचे इतरही वापर आहेत. पण आपण बादल्या दररोज स्वच्छ करतोच, असे नाही.

बादल्या अस्वच्छ असल्यामुळे त्या मेणचट दिसतात. शिवाय बादल्यांवरची घाण घासूनही निघत नाही. बादल्या जर चांगल्या असतील पण, न घासल्याने त्याचे मेणचट डाग निघत नसतील तर, ३ गोष्टींचा वापर करून पाहा. या ३ गोष्टींचा वापर केल्याने मेणचट बादल्या नव्यासारख्या दिसतील(Bathroom Mug or Bucket Cleaning / Easy Tips).

बेकिंग सोडा

मेणचट-कळकट झालेल्या बादल्या साफ करण्यासाठी आपण बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. बेकिंग सोडा फक्त स्वयंपाकासाठी नसून, वस्तू स्वच्छ करण्यासाठीही करू शकता. यासाठी एका भांड्यात डिशवॉश लिक्विड, लिंबाचा रस, पाणी आणि बेकिंग सोडा घालून मिक्स करा. तयार मिश्रण बादल्यांना लावा. नंतर स्क्रबरने बादल्या घासून काढा. १० मिनिटानंतर बादल्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. या उपायामुळे बादल्या काही मिनिटात नव्यासारख्या चमकतील.

शाळांमध्ये मुलांना मिळणार ३ वॉटर ब्रेक; या ब्रेकमागचा हेतू काय? मुलांनी दिवसभरात नेमकं किती पाणी प्यावं?

व्हिनेगर

व्हिनेगरचा वापर बादल्या स्वच्छ करण्यासाठी करण्यात येऊ शकते. यासाठी एका बाऊलमध्ये समप्रमाणात व्हिनेगर आणि डिशवॉश लिक्विड घेऊन मिक्स करा. तयार मिश्रण बदल्यांवर लावा. काही वेळ तसेच ठेवा. नंतर ब्रशने बादल्या घासून काढा. शेवटी पाण्याने बादल्या स्वच्छ धुवून घ्या.

तुमच्याही चेहऱ्यावर मुरुमांचे डाग-सूज आली आहे? हे वाढत्या कोलेस्टेरॉलचं तर लक्षण नाहीत ना..?

हायड्रोजन पेरोक्साइड

बादलीचे हट्टी डाग काढण्यासाठी आपण हायड्रोजन पेरोक्साइडचा वापर करू शकता. याने बादल्याच नसून, अनेक गोष्टी स्वच्छ होतील. यासाठी एका बाऊलमध्ये हायड्रोजन पेरोक्साइड आणि त्यात पाणी मिसळून मिश्रण तयार करा. आता ब्रश मिश्रणात बुडवून बादल्या स्वच्छ घासून काढा. नंतर पाण्याने बादल्या धुवा. 

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरल