उत्तर कोरिया हा देश नेहमी काही ना काही कारणांमुळे चर्चेत येतो. हुकुमशाह किंम जोंग उन हा विविध नियमे आपल्या नागरिकांवर लादताना दिसून येतो. त्यांचे अजब गजब नियम सोशल मिडीयावर व्हायरल होत राहतात. तेथील असाच काहीसा अजब नियम चर्चेत आला आहे. त्यांनी नुकतंच उत्तर कोरियामधल्या महिलांचे सौंदर्य वाढवणाऱ्या लिपस्टिकवर बंदी घातली आहे. किम जोंगने अजब फर्मान काढत महिलांच्या रेड लिपस्टिकच्या वापरावर बंदी घातली आहे. यासह इतर सौंदर्य प्रसाधने वापरण्यावर देखील बंदी घातली आहे.
महिलांना मेकअप करायला खूप आवडते. मेकअप केल्याने त्यांचं सौंदर्याला चारचांद लागतात. मेकअप हा एक महिलांचा अविभाज्य भाग आहे, असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. त्यात लिपस्टिक म्हटलं की महिलांचा जिव्हाळ्याचा विषय. मात्र, हुकुमशाह किंम जोंग उन यांनी लिपस्टिक आणि इतर सौंदर्य प्रसाधनांवर बंदी घातल्यामुळे त्यांच्यावर टिकेची झोड उठत आहे.
रेड लिपस्टिकवर बंदी
महिलांचा मेकअप लूक पूर्ण करण्यासाठी लिपस्टिक मदत करते. महिला त्यांच्या कलर टोननुसार लिपस्टिक खरेदी करतात. मात्र, उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांनी लाल लिपस्टिकवर बंदी घातली आहे. उत्तर कोरियामध्ये लाल रंग हा भांडवलशाही, कम्युनिस्ट आणि व्यक्ती स्वातंत्र्यवाद यांचं प्रतिक मानला जातो. यामुळे उत्तर कोरियामध्ये लाल रंगांची लिपस्टिक वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
महिलांच्या मेकअपची केली जाते तपासणी
उत्तर कोरियामध्ये लाल लिपस्टिकवर बंदी घातल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. या नियमांचं कोण पालन करत आहे की नाही याची तपासणी देखील करण्यात येत आहे. यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आलं आहे. ही पेट्रोलिंग टीम दररोज महिलांच्या मेकअपची तपासणी करते. जर महिलांनी या नियमांचं उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाईसह दंड करण्यात येत आहे.
रेड लिपस्टिकसह या गोष्टींवरही आहे बंदी
उत्तर कोरियामध्ये लाल लिपस्टिकवरच नाही तर, केसांना कलर लावण्यावरही बंदी आहे.उत्तर कोरियातील महिला फक्त उत्तर कोरियामध्ये बनवली जाणारी सौंदर्यप्रसाधने वापरू शकतात. याशिवाय महिलांना हलक्या रंगाची लिपस्टिक लावण्याची परवानगी आहे. यासह चेन, अंगठी, ब्रेसलेट असे दागिने घालण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.