दिवाळीच्या आधी प्रत्येकजण घराची साफ-सफाई करतो. (Home Cleaning in Diwali) साफसफाई करताना तांब्या-पितळाची भांडी आधी स्वच्छ केली जातात. तांब्यांची भांडी घासून ठेवल्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा काळी दिसू लागतात. साबण, पाण्याने कितीही स्वच्छ केले तरी या भांड्यांवरचे डाग निघत नाहीत. (Diwali Cleaning Tips)
हे डाग काढून टाकण्यासाठी बाजारात अनेक लिक्विड् आणि पावडर मिळतात. (How to clean silver vessels, pooja items at home) या पावडर आणि लिक्विडचा वापर केल्यानंतरही तासनतास भांडी घासत बसावी लागतात तेव्हा भांड्यांवरचे डाग निघतात. (Simple Steps to Clean Pooja Utensils in Time For Diwali)
काही सोप्या घरगुती टिप्स पुजेच्या साहित्यातील तांब्या पितळाची भांडी तसेच तांब्याचे हंडा कळशी चमकवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. हे उपाय करण्यासाठी तुम्हाला अजिबात पैसे खर्च करावे लागणार नाहीत. घरच्याघरी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून तुम्ही तांब्या-पितळाची भांडी स्वच्छ करू शकता. (How to clean brass pooja items)
तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी पेस्ट कशी तयार करावी?
तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी पेस्ट बनवण्यासाठी सगळ्यात भांडं घ्या. त्यात २ चमचे बेसन घाला, २ चमचे मीठ घाला मग २ चमचे दही घाला सगळ्यात शेवटी यात अर्धा लिंबू पिळा. सर्व साहित्य एकजीव करून या मिश्रणाची पेस्ट बनवून घ्या.
दिवाळीची साफ-सफाई करताना नक्की घराबाहेर काढा ५ गोष्टी; सकारात्मकता-शांतता राहील घरी
भांडी कशी स्वच्छ करावीत
बेसनाची पेस्ट तयार झाल्यानंतर ही पेस्ट तांब्याच्या भांड्यांवर लावा. नंतर वापरात नसलेल्या किंवा नवीन ब्रशच्या साहाय्याने भांडी स्वच्छ घासून घ्या. नंतर पाण्याने ही भांडी स्वच्छ धुवा. या उपायाने तांब्याची भांडी लगेचच चकचकीत, स्वच्छ होतील.
बेकिंग सोडा
पितळाची भांडी चमकवण्यासाठी बेकींग सोड्याचा वापर करू शकता. यासाठी १ चमचा बेकींग सोडा घ्या त्यात थोडा लिंबाचा रस मिसळा. ही पेस्ट पितळाच्या भांड्यांना आणि मूर्तींना लावता येऊ शकते. यासाठी १ चमचा बेकिंग सोडा घ्या. त्यात थोडा लिंबाचा रस मिसळा ही पेस्ट पितळाच्या भांड्यांना आणि मूर्तींना लावा. नंतर गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. या उपायाने मूर्ती आणि भांड्यांवरचा काळेपणा निघून जाईल.
चिंचेचा वापर
पितळाची भांडी चमकवण्यासाठी तुम्ही चिंचेचा कोळ वापरू शकता. यासाठी चिंच गरम पाण्यात भिजवून ठेवा. भिजवल्यानंतर १५ मिनिटांनी चिंच व्यवस्थित मॅश करा आणि पल्प काढून घ्या. नंतर पल्प स्क्रबप्रमाणे भांड्यांवर रगडा. या उपायाने भांडी नव्यासारखी चमकू लागतील.