Join us  

वाढदिवसाचा केक चेहऱ्याला फासता, फेकून मारता? २ गोष्टी चुकूनही करु नका, आयुष्यभर पस्तावाल कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2024 4:47 PM

Birthday Celebration With Cake: वाढदिवसाला केक कापावा, आनंदाने खावा -असं न करता काहीजण केक चेहऱ्याला फासतात, काहीतर केकमध्येच चेहरा बुडवतात, पण त्याचे परिणाम काय होतील विचार केलाय का? (Before smashing someone's face into birthday cake, remember 3 things)

ठळक मुद्देहल्ली केक वेगवेगळ्या आकारात आणि बऱ्याच थराचे असतात. त्यामुळे केकच्या बॅलेन्सिंगसाठी त्यामध्ये लाकडी टोकदार काड्या लावलेल्या असतात.

वाढदिवसाचं सेलिब्रेशन केक कापल्याशिवाय होत नाही हे मान्य आहे. केक कापल्याशिवाय वाढदिवसाचा आनंदही वाढत नाही. केक अवश्य कापा, त्याला ना मुळीच नाही. केक कापून सगळ्यांनी खाऊन जोरदार सेलिब्रेशनही करा. पण हे सगळं करताना आणि विशेषत: केकच्या बाबतीत कोणतीही गोष्ट करताना जरा जपून.. हल्ली एक ट्रेण्ड खूपच वाढला आहे. तो म्हणजे ज्याचा वाढदिवस असेल त्याचा चेहरा केकमध्ये जबरदस्तीने बुडवायचा. किंवा मग केकचा मोठा तुकडा घेऊन तो सगळा त्याच्या तोंडाला जोरजोरात चोळून फासायचा. तुम्हीही तुमच्या जिवलगांच्या आनंदासाठी त्याच्या वाढदिवसाला हे असं सगळं करत असाल तर थोडं थांबा. कारण हे सगळं त्यांच्यासाठी किती धोकादायक ठरू शकतं ते पाहा....(Before smashing someone's face into birthday cake, remember 3 things)

 

हल्ली केक वेगवेगळ्या आकारात आणि बऱ्याच थराचे असतात. त्यामुळे केकच्या बॅलेन्सिंगसाठी त्यामध्ये लाकडी टोकदार काड्या लावलेल्या असतात. जेव्हा तुम्ही तुमच्या मित्र- मैत्रिणीचा चेहरा बळजबरीने दाबून त्या केकमध्ये बुडवता, तेव्हा त्यातल्या टोकदार काड्या त्यांच्या चेहऱ्याला खूप जास्त इजा करू शकतात.

कारल्याच्या चटपटीत भाजीची खास रेसिपी! कडवटपणा अजिबात जाणवणार नाही, मुलंही आवडीने खातील

अशाच पद्धतीचा एका व्हिडिओ काही दिवसांपुर्वी साेशल मिडियावर खूप व्हायरल झाला होता. असं काही आपल्या जिवलगांच्या बाबतीत होऊ द्यायचं नसेल तर यापुढे केकमध्ये कोणाचा तरी चेहरा जोरात बुडवणे आणि दाबणे बंद करा. 

 

दुसरं म्हणजे केकवर असणाऱ्या पदार्थांचा परिणाम त्वचेवर होऊ शकतो. केक डोळ्यात जाऊन डोळ्याच्या नाजूक भागाला इजा करू शकतो. तसेच एखादा तुकडा नाकात अडकून श्वास घेण्यासही त्रास होऊ शकतो.

श्लोका अंबानीच्या गळ्यात चमकणारा 'तो' अस्सल खानदानी दागिना नेमका कोणाचा? बघा त्याची किंमत...

असं काहीही आपल्या जिवलग व्यक्तीच्या बाबतीत व्हायला नको असेल तर केक कापताना एवढा एक नियम पाळाच.. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केक हा एक अन्नपदार्थ आहे. तो अशा पद्धतीने वाया जाणे अजिबातच चांगले नाही. त्यामुळे केक वाया घालवून, त्याद्वारे दुसऱ्याला त्रास देऊन नाही तर तो भरपूर खाऊन वाढदिवसाचं सेलिब्रेशन करा.. पार्टीचा आनंद नक्कीच वाढेल. 

 

टॅग्स :सोशल व्हायरल