गॅस पेटवण्यासाठी लायटरचा (Lighter) वापर होतो (Kitchen Tips). लायटर नसेल तर गॅस पेटवायचा कसा असं प्रश्न पडतो. स्वयंपाक झाल्यानंतर आपण भांडी घासून शेगडी नियमित स्वच्छ करतो (Cleaning Tips). पण आपण लायटर नियमित स्वच्छ करत नाही. बराच वेळ लायटर साफ न केल्यामुळे ते खूप कळकट - अस्वच्छ दिसतात.
जेवण बनवत असताना मसाल्यांचे हात लागल्यामुळे ते चिकट होतात. लायटर साफ करताना अनेकदा त्यात पाणी शिरते, ज्यामुळे लायटर खराब होण्याची शक्यता वाढते. त्याचा स्पार्क कमी होतो. पाण्याच्या संपर्कात येऊ नये म्हणून आपण लायटर स्वच्छ करणं टाळतो. पण जर लायटर फार घाण झाले असेल, तर काही टिप्स फॉलो करा. अगदी काही मिनिटात लायटर स्वच्छ होईल(Beginner's guide to lighter maintenance and cleaning).
रोप वाढते पण गुलाबाची फुलंच येत नाही? कांदा - लसणाचा ' असा ' करा वापर; फुले येतील भरपूर
लायटर स्वच्छ करण्यासाठी फॉलो करा काही टिप्स
- लायटर स्वच्छ करण्यासाठी आपण बेकिंग सोडा आणि लिंबाचा वापर करून पाहू शकता. यासाठी एका बाऊलमध्ये बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस घ्या. मिक्स करून घट्ट पेस्ट तयार करा. तयार पेस्ट लायटरला लावून २० - ३० मिनिटांसाठी ठेवा. नंतर सुक्या कापडाने लायटर पुसून स्वच्छ करा.
बळकट हाडांसाठी फक्त दूध पिता? त्यात घाला '५' गोष्टी; बॅड कोलेस्टेरॉल घटेल - हृदयही राहील निरोगी
- लायटर स्वच्छ करण्यासाठी आपण इनो आणि तांदळाच्या पाण्याचाही वापर करू शकता. यासाठी एका बाऊलमध्ये एक चमचा इनो आणि तांदुळाचं पाणी घालून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट लायटरला लावा. काही वेळानंतर स्क्रबरने स्वच्छ करा. मिनिटात लायटर स्वच्छ होईल.
- आपण टूथपेस्टच्या वापरानेही लायटर स्वच्छ करू शकता. यासाठी रात्री लायटरला टूथपेस्ट लावा. सकाळी स्क्रबरने घासून लायटर स्वच्छ करा. नंतर सुक्या कापडाने लायटर पुसून घ्या. यामुळे लायटरचा काळेपणा सहज निघेल.