सध्या सोशल मिडीयाचा जमाना आहे. बरेच जणांचे विविध सोशल मिडिया अकाऊंट्समध्ये प्रोफाईल आहेत. काही जण दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी सोशल मिडीयात शेअर करतात. तर, काही जण फक्त अपडेट राहण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर करतात. बरेच लोकं विविध अॅप्स लॉन्च करतात. सध्याच्या काळात तरूणाईंना डेटिंग अॅप्सचं (Dating App) खूळ लागलं आहे.
स्वाईप लेफ्ट आणि राईट करत लोकं एकमेकांना भेटून डेटला जातात. बरेच जण यातूनच जोडीदार शोधतात. टिंडर (Tinder) ही डेटिंग साईट आपल्याला ठाऊकच असेल. पण या डेटिंग साईटचा पुरेपूर आणि हटके वापर एका मुलीने केला आहे. तिने याचा वापर फ्लॅटमेट शोधण्यासाठी केला असून, तिची हटके पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. तिची पोस्ट व्हायरल का होत आहे? तिने पोस्टमध्ये नक्की असं काय लिहिलं? पाहूयात(Bengaluru Woman Creates Profiles For Her Flat On Dating Apps To Find Roommate).
फ्लॅटमेट शोधण्यासाठी मुलीने वापर केला डेटिंग अॅपचा वापर
ज्या मुलीची पोस्ट व्हायरल झाली, त्या अतरंगी मुलीचे नावं करुणा टाटा असे आहे. तिने डेटिंग साईटवर स्वतःचे प्रोफाईल तयार करण्याऐवजी फ्लॅटचे प्रोफाईल तयार केले. या प्रोफाईलच्या माध्यमातून ती फ्लॅटमेटचा शोध घेत आहे. मुलीने या फ्लॅटचे नाव खोली नंबर ४२० ठेवले आहे. खोली नंबर ४२० हे आपण अनेक चित्रपटांमध्ये पाहिलं असेल.
१९७७ मध्ये प्रदर्शित झालेला 'अमर, अकबर, अँथनी' हा चित्रपट सर्वांनाच ठाऊक असेल. ज्यामध्ये अमिताभ बच्चन, ऋषी कपूर आणि विनोद खन्ना सारखे दिग्गज कलाकार होते. या चित्रपटात एक गाणे होते, ज्यामध्ये खोली नंबर ४२० या वाक्याचा वापर जास्त वेळ करण्यात आला होता.
असे कसे हे ओठ? जगात सर्वात मोठे ओठ असल्याचा दावा करणाऱ्या तरुणीचे पाहा हाल
टिंडरवर बनवले फ्लॅटचे प्रोफाईल
करुणाने एक्स अकाऊंटवर फ्लॅटबद्दल माहिती शेअर केली. त्यात तिने हे घर बंगळूरूस्थित बिल्डींगमध्ये ३ बीएचके असल्याचं सांगितलं. तिने पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'बेंगळुरूमधील कठीण क्षण आहे की स्टार्टअपची कल्पना, खोली नंबर ४२० ला भेट द्या, ज्याचे टिंडरवर अकाऊंट आहे. आम्ही यातून फ्लॅटमेट्स शोधत आहोत'. करुणाने घराविषयी खूप मनोरंजक तपशील शेअर केला असून, तिची ही पोस्ट काही मिनिटात व्हायरल झाली. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेण्ट करत या पोस्टचे कौतुक केले.
वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतल्यावरही कुबट वास येतो? ४ टिप्स, कपडे चकाचक, दुर्गंध गायब
पोस्ट लिहिण्यामागचे कारण..
मनीकंट्रोल या वेबसाइटशी बोलताना करुणा म्हणते, 'माझा आणि मैत्रीणीचा फ्लॅटच्या मालकाशी जॉइंट कॉन्ट्रॅक्ट तयार झाले होते. मला आता हा फ्लॅट सोडायचा आहे, आणि त्यामुळे मी माझ्या जागेवर बदली शोधत आहे. कारण यानंतरच घरमालक डिपॉजिट केलेले ३६ हजार रुपये परत करतील.'