एकदा हरवलेली वस्तू अनपेक्षितपणे पुन्हा सापडल्याच्या आनंदापेक्षा दुसरा आनंद कोणताच नसू शकतो. रोज रिक्षा, बस, ट्रेननं प्रवास करताना अनेक वस्तू हरवतात ज्या कधीच परत सापडत नाहीत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या घटनेत एका तरूणीचे एअरपॉर्ड्स हरवले होते आणि रिक्षावाल्याच्या प्रयत्नांमुळे ते पुन्हा सापडले.
ट्विटर वापरकर्त्याने पोस्ट केलेल्या स्टोरीमध्ये बेंगळुरूमधील ऑटो ड्रायव्हर आहे. पोस्टनुसार, कामावर जाताना शिदिकाने तिचे एअरपॉड्स ऑटोमध्ये चुकून विसरली होती. मात्र, अर्ध्या तासात तिचे महागडे गॅझेट परत मिळाल्याने तिला आश्चर्याचा धक्का बसला.(Bengaluru woman forgot her airpods in an auto what the driver did next has impressed people)
कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "ऑटोमध्ये प्रवास करताना माझे एअरपॉड्स हरवले. अर्ध्या तासानंतर, मला WeWork येथे सोडणारा हा ऑटोचालक गेटवर आला आणि त्याने ते परत सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या हवाली केले. वरवर पाहता, त्याने मालकाचे नाव शोधण्यासाठी AirPods कनेक्ट केले आणि माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा PhonePe व्यवहाराचा वापर केला.''
श्रद्धासारखी वेळ येऊ देऊ नका; लोक काय म्हणतील...', एक्सपर्ट्सचा महत्वाचा सल्ला
ऑटो चालकाच्या प्रयत्नांनी लोक पूर्णपणे प्रभावित झाले आहेत. पोस्टवर 9,000 हून अधिक लाइक्ससह कमेंट्स आल्या आहेत. या घटनेने त्यांचा माणुसकीवरचा विश्वास आणखी कसा वाढला आहे हे शेअर करण्यासाठी लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी आपल्या हरवलेल्या वस्तू कशा सापडल्या त्याचे अनुभव सोशल मीडियावर शेअर केले आहेत.