Lokmat Sakhi >Social Viral > साबणावरुन पाय घसरला आणि ‘ती’ थेट तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडली, बघा नेमकं झालं काय?

साबणावरुन पाय घसरला आणि ‘ती’ थेट तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडली, बघा नेमकं झालं काय?

Bengaluru Woman Steps On Soap, Falls From Terrace : एक लहानसा अपघात किती मोठ्या संकटात ढकलतो, महिलेच्या वाट्याला नेमकं तेच आलं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2024 01:44 PM2024-06-26T13:44:02+5:302024-06-26T13:45:04+5:30

Bengaluru Woman Steps On Soap, Falls From Terrace : एक लहानसा अपघात किती मोठ्या संकटात ढकलतो, महिलेच्या वाट्याला नेमकं तेच आलं..

Bengaluru Woman Steps On Soap, Falls From Terrace | साबणावरुन पाय घसरला आणि ‘ती’ थेट तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडली, बघा नेमकं झालं काय?

साबणावरुन पाय घसरला आणि ‘ती’ थेट तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडली, बघा नेमकं झालं काय?

कोणावर कधी कोणता प्रसंग ओढावेल हे सांगता येत नाही (Bengaluru). आपल्यासोबतही अशा अनेक घटना घडतात, ज्याचा आपण कधीही विचार केलेला नसेल. कधी कोणावर मृत्यू ओढावेल आणि कधी कोण मृत्यूच्या जबड्यातून बाहेर येईल, सांगता येत नाही (Falls from Terrace). असंच एक प्रकरण कर्नाटकातील बंगळुरु येथे घडली आहे (Social Viral).

एका साबणामुळे महिला गच्चीवरून पडली. पण 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती' गच्चीवरून पडूनही महिला बचावली असून, सध्या या घटनेची चर्चा सर्वत्र होत आहे. महिलेचे गच्चीवर लटकतानाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नक्की घडलं काय? महिला गच्चीवरून पडलीच कशी? पाहूयात(Bengaluru Woman Steps On Soap, Falls From Terrace).

एकेकाळी तिचं ९५ किलो वजन होतं, सोनाक्षी सिन्हाने ३० किलो वजन घटवलं, वाचा कसं..

साबणावर पाय- तोल गेला आणि मग..

बंगळुरुमध्ये एक धक्कादायक घटना घडली. २७ वर्षीय रुबाई बिल्डींगच्या गच्चीवर कपडे धूत होती. तेव्हा तिच्यासोबत तिचा नवराही होता. कपडे धुतल्यानंतर ती कपडे वाळत घालण्यासाठी उठली. तेव्हा तिचा पाय एका साबणावर पडला, आणि महिलेचा तोल गेला व ती छतावरून खाली पडली.

ती सोडून गेली आणि ‘त्यानं’ स्वत:ला बदलून टाकलं, पाहा ब्रेकअपने आयुष्य पालटवणाऱ्या तरुणाची गोष्ट

स्वतःला सावरत तिने छताच्या कोपऱ्याला पकडलं. प्रसंगावधान दाखवत महिलेच्या पतीने तिचा हात पकडला. त्याने पत्नीला वर खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र, हात सटकला, आणि ती तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली. इमारतीवरून पडल्यानंतर तिच्या शरीरातून रक्त वाहत होतं. नवरा धावत खाली गेला. तिथे उभ्या असलेल्या लोकांनी रुग्णवाहिका बोलावली.

महिलेला तातडीने व्हिक्टोरिया रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान महिला कोमात गेली. तिची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात आलं आहे. हे प्रकरण डीजे हल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कनकनगरचे असून, या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Web Title: Bengaluru Woman Steps On Soap, Falls From Terrace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.