Join us  

सैल झालेला कुर्ता काही सेकंदातच परफेक्ट फिटिंगचा करण्याची मस्त ट्रिक! सुई- दोऱ्याची गरजच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2024 1:29 PM

Best Hack For Loose Kurti: सैल झालेला कुर्ता अगदी काही सेकंदात बघा तुमच्या मापाचा कसा करायचा... आणि ते ही सुई- दोरा न वापरता.. (how to make your loose kurti perfectly fit without stitching in few seconds?)

ठळक मुद्देकुर्ता तुमच्या मापाचा करण्यासाठी सुई- दोरा घेऊन तो शिवत बसण्याची अजिबातच गरज नाही

बऱ्याचदा असं होतं की आपला एखादा जुना कुर्ता आपल्याला पुन्हा घालण्याची इच्छा होते. पण त्यावेळी तो आपल्याला नेमका सैल झालेला असतो. किंवा कधी कधी असंही होतं की आपल्याला एखाद्या कार्यक्रमासाठी आपल्या मैत्रिणीचा, बहिणीचा किंवा अन्य कोणाचा कुर्ता घालायचा असतो. पण तो आपल्या मापाचा नसतो. खूप सैलसर असतो. अशावेळी तो कुर्ता तुमच्या मापाचा करण्यासाठी सुई- दोरा घेऊन तो शिवत बसण्याची अजिबातच गरज नाही (best hack for loose kurti). ही एक खास ट्रिक पाहा. अवघ्या काही सेकंदातच तो कुर्ता अगदी परफेक्ट तुमच्या मापाचा होऊन जाईल. (how to make your loose kurti perfectly fit without stitching in few seconds?)

 

सैल झालेला कुर्ता न शिवता परफेक्ट फिटिंगचा करण्याची ट्रिक

सैल झालेला कुर्ता सुई- दोऱ्याचा वापर न करता परफेक्ट आपल्या फिटिंगचा कसा करावा, याविषयीचा एक छानसा व्हिडिओ itsnehaa_rg या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

वयानुसार रात्री किती तासांची झोप गरजेची असते? मुलांनी किती तास झोपावं? बघा तज्ज्ञांचा सल्ला

ही ट्रिक तुम्हाला तुमचा अनारकली पॅटर्नचा कुर्ता फिटिंगचा करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. ज्या कुर्त्यांना दोन्ही बाजुंनी कट असतो, त्यांच्यासाठी ही ट्रिक उपयोगी नाही. 

 

यासाठी सगळ्यात आधी तर तो कुर्ता उलटा करा. यानंतर कुर्त्याच्या पुढच्या बाजुने काही अंतर ठेवून दोन सेफ्टी पिना लावा. कुर्त्याची दोन्ही बाजुंची शिलाई जिथे असते तिथून साधारण दोन्ही बाजुने ५- ५ सेमी अंतर ठेवून पिना लावा. आता या पिनांमध्ये एक दोरी किंवा नाडा अडकवा आणि त्याची गाठ मारा. 

पावसाळ्यात लाकडी फर्निचर, दरवाजे- खिडक्या फुगणार नाहीत, ३ उपाय करा- कुबट वासही जाईल

याविषयीचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये फक्त पुढच्या बाजुनेच पिना लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पण कुर्ता अगदी परफेक्ट फिटिंगचा वाटावा, त्यामध्ये कोठेही झोळ पडू नये म्हणून वरील पद्धतीने मागच्या बाजुनेही पिना लावून नाडा अडकवून गाठ मारा. कुर्ता अगदी छान मापाचा बसेल. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलहोम रेमेडी