डास चावले की, गंभीर आजार शरीराला विळखा घालतात. डेंग्यू, मलेरियासारख्या गंभीर तापांना कारणीभूत ठरणारे डास घातक ठरतात. डासांपासून सुटका मिळवण्यासाठी आपण अनेक उपाय करून पाहतो. मच्छरदाणीमध्ये झोपणे, मॉस्किटो रिपीलंट, मॉस्किटो कॉइल असे अनेक उपाय करूनही डास चावतात. शिवाय केमिकल उत्पादनांमुळे आपल्या आरोग्याला त्रास होतो तो वेगळा.
जर आपल्याला याचा त्रास होऊ नये, शिवाय घरात डास फिरकू नये असे वाटत असेल तर, घरगुती उपायांचा वापर करून डासांना घरातून पळवून लावा (Mosquitoe Bite). यासाठी एक लिंबू आणि काही साहित्यांची गरज भासणार असून, या उपायामुळे काही मिनिटात डास दूर होतील. शिवाय या नैसर्गिक उपायामुळे घरात डास शिरणार नाही(Best Home Remedies for Mosquito Bites).
डासांना पळवून लावण्यासाठी एक सोपा उपाय
साहित्य
लिंबू
मोहरीचे तेल
कापूर
कापूस
तुळस सतत सुकते, पानांवर काळी बुरशी पडते? तुळशीला पाणी घालताना तुम्ही करता ६ चुका
लवंग
अशा पद्धतीने तयार करा डासांना पळवून लावणारा दिवा
सर्वप्रथम, एक लिंबू घ्या, त्याचा वरचा भाग कापून घ्या. त्याच्या आतील रस आणि पल्प चमच्याने काढा. पल्प काढल्यानंतर त्यात एक चमचा मोहरीचे तेल घाला. एका मातीच्या दिव्यावर लिंबू ठेवा. नंतर त्यात कापूर पावडर, लवंग पावडर आणि ओवा घाला. नंतर कापसाची वात तयार करा. वात तेलात बुडवून लिंबूच्या आत ठेवा. सायंकाळ झाल्यास वात पेटवून दिवा जिथे जास्त मच्छरांचा वावर असेल तिथे ठेवा. या उपायामुळे काही मिनिटात मच्छर गायब होतील. शिवाय घरात मच्छर शिरणार नाही.
मोठ्या मनाचं लहान लेकरु! स्पर्धा जिंकून मिळालेल्या पैशातून मदतनीस मावशीसाठी आणला फोन -व्हायरल पोस्ट
मोहरीचे तेल मच्छरांना लावते पळवून
मोहरीचे तेल मच्छर प्रतिबंधक म्हणून काम करते. मोहरीच्या तेलात ओवा, कापूर आणि लवंग मिक्स केल्याने उग्र सुगंध तयार होतो. या मजबूत सुगंधामुळे मच्छर घरात शिरणार नाही. शिवाय घरातील डास बाहेर पळून जातील.