दिवाळी (Diwali 2023) म्हटलं की सगळ्यात आधी डोळ्यांसमोर रांगेळ्या येतात. पण दिवाळीच्या ४ ते ५ दिवसांत घरांत पाहूणे मंडळी येतात किंवा आपल्याला बाहेर जायचं असतं. (Best Rangoli Designs) अशावेळी इच्छा असूनही छानश्या रांगोळ्या काढता येत नाहीत. (Rangoli Kashi Kadhaychi Dakhva) सोप्या पद्धतीनं रांगोळ्या काढण्यासाठी तुम्ही युनिक ट्रिक्स फॉलो करू शकता म्हणजेच चहाचे कप, हँगर, चिमटे, हेअर पीन्स, कंगवा अशा साहित्यांचा वापर करून तुम्ही आकर्षक सुंदर रांगोळ्या काढू शकतात. (Easy Rangoli Design Ideas for Diwali)
चहा किंवा कॉफीचे मग वापरून पटकन रांगोळी कशी काढायची ते पाहूया. (Rangoli Design Using Tea Cup) दारासमोर ही रांगोळी काढली तर घराची शोभा वाढेल आणि दरवाजा उठून दिसेल. तर लादी काळपट झाली असेल तर किंवा डार्क रंग लादीवर असले तर रांगोळी उठून दिसण्यासाठी आधी गेरूने रंगवून घ्या जेणेकरून रांगोळी अधिकच परफेक्ट, उठून दिसेल. (Unique Rangoli Design Using Kitchenn Utensils)
चहाचे कप वापरून रांगोळी कशी काढायची? (Simple Rangoli Designs for Home)
१) ही रांगोळी काढण्यासाठी सगळ्यात आधी दोरा आणि पांढऱ्या खडूच्या साहाय्याने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्कल काढून घ्या. मधल्या सर्कलमध्ये सहा समान आकाराचे कप ठेवा. मग त्यावर लाल किंवा गुलाबी असा कोणताही तुमच्या आवडीचा रंग चाळणीच्या साहाय्याने घाला. नंतर कप बाजूला काढा. कपाच्या आकाराचा भाग मोकळा झालेला दिसून येईल.
२) नंतर छोट्या सर्कल्सच्या आतल्या बाजूने बारीक ठिपके काढून छानन आकार द्या. त्यानंतर छोटा पेंटीग ब्रशच्या मागच्या टोकाने हे ठिपके मागून पुढे सरकवून घ्या. तुम्ही ब्रशऐवजी पेन्सिलसुद्धा वापरू शकता. यामुळे छान फुलांप्रमाणे आकार तयार होईल.
३) नंतर फुलांच्या मधोमध रंग भरूनमध्ये गडद रंगाची रांगोळी घाला जेणेकरून फुलं अधिकच उठून दिसतील. बाटणीच्या झाकणाने मधले ठिपके चपटे करून घ्या. त्यानंतर मध्येही एक सर्कल तयार करून त्यात आधी ठिपके काढून फुलाचा आकार द्या आणि मध्ये डार्क रंगाचा ठिपका काढा.
ओटी पोटाचा घेर जास्त वाढलाय? उभ्या उभ्या १ योगासन करा-१५ दिवसांत सुटलेलं पोट होईल सपाट
४) मोठ्या सर्कल्याच्या बॉर्डरवर पांढऱ्या, पिवळ्या किंवा कोणत्याही लाईट रंगाचे ठिपके काढून घ्या. त्याला पानांचा आकार द्या. दोन सर्कलच्या मधल्या गॅपमध्ये ऑरेंज रंग घाला. त्यानंतर चक्राप्रमाणे लहान फुलं मधल्या गॅपमध्ये काढून घ्या खाली पानांप्रमाणे आकार द्या.
काय खाल्ल्याने वजन पटकन कमी होतं? सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी सांगितला एकदम सोपा आहार
५) शेवटच्या टप्प्यात व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बारीक ठिपके काढून मग आतल्या बाजूच्या गॅपमध्ये रंग भरून फुलाप्रमाणे आणि पानांचा आकार तयार करा. या पद्धतीने तुम्ही आकर्षक रांगोळी कमीत कमी वेळात काढू शकता.