Join us  

हरबऱ्यांना लगेच भुंगा लागतो- वाया जातात? ४ सोपे उपाय, महिनोंमहिने हरबऱ्यांना कीड लागणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2024 9:19 AM

How To Store Chana Properly: हरबऱ्यांना किंवा काबुली चण्यांना लगेच भुंगा लागतो आणि मग ते वाया जातात. असं होऊ नये म्हणून बघा काय करायचं... (4 remedies to keep chana safe from insects)

शाकाहारी लोकांच्या शरीरात प्रोटीन्सची कमतरता असतेच. त्यामुळेच तर त्यांनी प्रोटीनयुक्त आहार जास्त प्रमाणात घ्यायला पाहिजे. शाकाहारी लोकांसाठी प्रोटीन्स देणारे जे काही उत्तम पदार्थ आहेत त्यापैकी एक म्हणजे हरबरे किंवा चणे. पण नेमकं होतं काय की आपण दुकानातून हरबरे आणून घरी साठवून ठेवतो. पण अगदी काहीच दिवसांत त्यांना भुंगा लागतो. इतर कोणत्याही धान्याच्या तुलनेत हरबऱ्यांना भुंगा किंवा किड खूप लवकर लागते (best storage method for cheakpeas). त्यामुळे मग ते वाया जातात आणि आपलं नुकसान होतं (how to store chana properly). म्हणूनच असं होऊ द्यायचं नसेल तर काय करावं याचे काही सोपे उपाय पाहा. अगदी कित्येक महिने तुमचे हरबरे अगदी स्वच्छ असतील. (4 remedies to keep chana safe from insects)

हरबऱ्यांना भुंगा लागू नये म्हणून उपाय

 

१. लाल मिरच्या

लाल मिरच्या म्हणजे हरबऱ्यांपासून भुंग्यांना दूर ठेवणारं जालीम औषध आहे.

आहारतज्ज्ञ सांगतात- लसूण चिरल्यानंतर फोडणीत टाकण्यापुर्वी 'हे' काम करा, तरच शरीराला त्याचे फायदे होतील

तुम्ही ज्या बरणीमध्ये हरबरे भरून ठेवले असतील त्या बरणीतच वाळलेल्या ४ ते ५ लाल मिरच्या टाकून ठेवा. मिरच्यांच्या तिखट वासाने हरबऱ्यांना किड लागत नाही आणि ते जास्त दिवस फ्रेश राहतात.

 

२. तेजपान

तेजपान हे स्वयंपाकाला चव आणण्यासाठी तर उपयुक्त आहेच. पण हरबऱ्यांसह इतर कोणत्याही कडधान्यांना किड लागू नये म्हणूनही त्यांचा खूप चांगला उपयोग होतो. हा उपाय करण्यासाठी २ ते ३ पानं हरबऱ्यांच्या बरणीत भरून ठेवा. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आवडलेले ‘मनेर के लड्डू’ एवढे का फेमस? पाहा पारंपरिक खासियत आणि रेसिपी

३. काचेची बरणी

बहुतांश घरांमध्ये स्टीलचे डबे किंवा प्लास्टिकचे कंटेनर हरबरे भरण्यासाठी वापरले जातात. त्याऐवजी काचेच्या एअरटाईट बरण्या वापरून पाहा. यामुळे बाहेरची आर्द्रता किंवा ओलावा त्यांच्यापर्यंत जाणार नाही आणि हरबरे अधिकाधिक दिवस फ्रेश राहतील. 

 

४. पावडर लावा

तांदूळ भरताना आपण त्यांना पावडर लावतो. त्याच पावडरचा उपयोग तुम्ही हरबऱ्यांसाठीही करू शकता.

फक्त २ पदार्थ चेहऱ्यावर चोळा- अदिती राव हैदरी सांगतेय ग्लोईंग त्वचेसाठी साध्या- सोप्या ब्यूटी टिप्स 

फक्त पावडर लावलेले हरबरे भिजत घालण्यापुर्वी ३ ते ४ वेळा स्वच्छ पाण्याने खळखळून धुवून घ्या. पावडरचा अंश पुर्णपणे निघून गेल्यानंतरच हरबरे भिजत घाला. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलकिचन टिप्स