Join us  

दीप अमावस्या: चांदीचे, पितळेचे दिवे न घासताच काही सेकंदातच होतील चकाचक- बघा १ सोपा उपाय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2024 5:19 PM

Deep Amavasya 2024: दीप अमावस्येनिमित्त किंवा इतर कोणत्याही वेळी दिव्यांची स्वच्छता करायची असेल तर या काही टिप्स तुमच्या नक्कीच उपयोगी येऊ शकतील...(simple, most easy and fastest trick to clean brass diya and silver diya)

ठळक मुद्देहे उपाय तुम्हाला प्रत्येकवेळी कमीतकमी मेहनतीत दिव्यांची स्वच्छता करण्यासाठी उपयोगी पडतील.

दीप अमावस्येच्या दिवशी घरातल्या सगळ्या दिव्यांची स्वच्छता करून त्यांचे पूजन केले जाते. म्हणूनच त्याआधी ते दिवे घासून- पुसून अगदी लख्ख केले जातात. यावर्षी दीप अमावस्या ४ ऑगस्ट रोजी साजरी होत आहे (Deep Amavasya 2024).  त्यामुळे घरोघरी दिवे स्वच्छ केले जाणार. म्हणूनच दिव्यांची स्वच्छता करण्यासाठी हे काही सोपे उपाय पाहून घ्या. हे उपाय तुम्हाला प्रत्येकवेळी कमीतकमी मेहनतीत दिव्यांची स्वच्छता करण्यासाठी उपयोगी पडतील. या दोन्ही उपायांचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे दिवे अजिबात घासत बसण्याची गरज नाही. ब्रशचा वापर न करताच दिवे स्वच्छ करण्याची ही भन्नाट ट्रिक एकदा बघूनच घ्या. (simple, most easy and fastest trick to clean brass diya and silver diya)

 

चांदीचे दिवे न घासता स्वच्छ करण्याची युक्ती

चांदीचे दिवे न घासता स्वच्छ करण्याची एक अतिशय सोपी युक्ती पाहा. यासाठी एक भांडे घ्या. त्या भांड्याच्या तळाशी ॲल्युमिनियम फॉईल लावून ठेवा. आता त्या भांड्यात १ ग्लास गरम पाणी टाका.

 

केसांवर करा 'लाल' पाण्याची जादू! केस गळणं तर थांबेलच- चमकदार होऊन वाढतीलही भराभर

त्यामध्ये १ टेबलस्पून बेकिंग सोडा आणि १ टीस्पून मीठ टाका. पाणी एकदा व्यवस्थित हलवून घ्या आणि त्यात चांदीचे दिवे बुडवून ठेवा. काही सेकंदातच चांदीचे दिवे स्वच्छ चकाचक होतील. चांदीच्या कोणत्याही लहानसहान वस्तू स्वच्छ करण्यासाठी ही ट्रिक उपयुक्त ठरते. 

पितळेचे दिवे न घासता कसे स्वच्छ करायचे?

आता पितळेचे दिवे न घासता कसे स्वच्छ करायचे ते पाहा. त्यासाठी एक भांड्यात २ ग्लास गरम पाणी घ्या. त्यामध्ये १ चमचा बेकिंग सोडा, १ चमचा डिटर्जंट पावडर आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळा.

फक्त केस जातील, मी तर तीच असेल ना...! असं म्हणत हिना खानने स्वत:च्या हातानेच केलं टक्कल 

या पाण्यात आता पितळेचे दिवे बुडवून ठेवा आणि ते भांडे गॅसवर गरम करायला ठेवून द्या. १० मिनिटे ते पाणी उकळू द्या. त्यानंतर गॅस बंद करा. आता पाणी कोमट झाल्यावर दिवे बाहेर काढून पाहा. ते अगदी चकाचक झालेले असतील. 

 

 

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरलइन्स्टाग्रामहोम रेमेडी