Lokmat Sakhi >Social Viral > कढई काळीकुट्ट होते-घासायचा ताप? २ भन्नाट ट्रिक्स-कढई कधीच काळी पडणार नाही...

कढई काळीकुट्ट होते-घासायचा ताप? २ भन्नाट ट्रिक्स-कढई कधीच काळी पडणार नाही...

best ways to clean tough burn stains from kadhai : How To Clean Kadai – Kitchen Cleaning Hacks : कढई काळी पडू नये, नव्यासारखी राहावी म्हणून २ उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2024 05:14 PM2024-10-02T17:14:46+5:302024-10-02T17:33:58+5:30

best ways to clean tough burn stains from kadhai : How To Clean Kadai – Kitchen Cleaning Hacks : कढई काळी पडू नये, नव्यासारखी राहावी म्हणून २ उपाय...

best ways to clean tough burn stains from kadhai Here's What To Do When Your Kadhai Gets All Stained Easiest Way to Clean a Burnt Aluminum Utensils | कढई काळीकुट्ट होते-घासायचा ताप? २ भन्नाट ट्रिक्स-कढई कधीच काळी पडणार नाही...

कढई काळीकुट्ट होते-घासायचा ताप? २ भन्नाट ट्रिक्स-कढई कधीच काळी पडणार नाही...

कढई, टोप किचनमधील काही मोजकी भांडी ही रोजच्या वापरात लागतातच. रोज या भांड्यांचा वापर केल्याने कालांतराने भांडी खराब होतात. काही काळाने ही रोजची भांडी अस्वच्छ दिसू लागतात. स्वयंपाक करताना काहीवेळा ही भांडी करपून त्यांचे पृष्ठभाग काळे पडू लागतात. एवढंच नव्हे तर त्यांच्या पृष्ठभागाशी असलेला तेलकटपण (How do you remove hard stains from kadai?) जात नाही. अशी भांडी घासण्यासाठी आपण साबण, स्क्रबर, लिक्विड सोपं यांचा वापर करतो. परंतु काहीवेळा यांचा वापर करुनही भांडी स्वच्छ होत नाहीत(Quick Tips To Clean Burnt Aluminium Utensils At Home).

रोजच्या वापरातील कढई ॲल्युमिनियमची असू देत किंवा लोखंडाची. या कढया आतमधून आणि बाहेरुन तेलकट होतात. याचबरोबर काहीवेळा या कढयांचे  पृष्ठभाग काळेकुट्ट पडतात. अशा कढया घासताना (How To Clean Kadai – Kitchen Cleaning Hacks) हात  दुखून येतात, पण कढया काही निघत नाहीत.  तेलकट, मसाल्याचे डाग असलेल्या कढया परत परत वापरल्यास कढया तळाशी काळ्याकुट्ट होतात. असं होवू नये यासाठी कढईचा पृष्ठभाग काळाकुट्ट झाल्यावर तो घासत बसण्यापेक्षा तो काळा होऊच नये यासाठी काही खास उपाय करता येतील ते पाहूयात. 

कढईच्या तळाचा भाग काळाकुट्ट होऊ नये म्हणून काय करावे ? 

१. कढईमध्ये काही मसालेदार किंवा तेलकट पदार्थ तयार केले किंवा कढई गॅसच्या मोठ्या फ्लेमवर ठेवली तर तिचा पृष्ठभाग काळा पडतो. असा काळा पडलेला कढईचा पृष्ठभाग पुन्हा स्वच्छ करण्यासाठी खूप मेहेनत घ्यावी लागते. यासाठीच कढईचा पृष्ठभाग काळा पडू नये यासाठी आपण सोपे उपाय वापरु शकतो. कढईच्या तळाचा भाग काळा पडू नये म्हणून कढई गॅसवर ठेवण्याआधी हा उपाय करावा. कढईचा तळाचा भाग किंचित पाणी घालून भिजवून घ्या. त्यानंतर चहा गाळण्याची गाळण घेऊन त्यात प्रत्येकी १/२ टेबलस्पून मीठ व बेकिंग सोडा घालून ते गाळणीच्या मदतीने कढईच्या पृष्ठभागावर पसरवून घ्यावे. गाळणीचा वापर केल्याने मीठ व बेकिंग सोड्याचे मिश्रण पृष्ठभागावर सर्वत्र समान पसरले जाण्यास मदत होते. हे मिश्रण कढईच्या पृष्ठभागावर पसरवून घातल्यानंतर कढई तशीच उचलून गॅसच्या फ्लेमवर ठेवावे. हा उपाय केल्याने कढई कधीच आतून बाहेरुन करपत नाही तसेच तिच्या तळाचा भाग देखील काळा होत नाही(best ways to clean tough burn stains from kadhai). 

केमिकल वापरुन लादी स्वच्छ पुसली तरी चिलटं-झुरळं-माशा येतातच घरात? करा ३ उपाय...


शाळेच्या युनिफॉर्मवर रोज शाईचे डाग? मुलांना ओरडण्यापेक्षा करा २ सोप्या टिप्स, युनिफॉर्म दिसेल नव्यासारखा...

२. कढईचा पृष्ठभाग काळा होऊ नये म्हणून आपण डिटर्जंट आणि तेलाचा देखील वापर करु शकता. यासाठी एका मोठ्या बाऊलमध्ये कोणतेही तेल आणि डिटर्जंट सम प्रमाणात घेऊन ते चांगले मिक्स करुन घ्यावेत. या मिश्रणाची थोडी मध्यम कन्सिस्टंन्सीची पेस्ट तयार करुन घ्यावी. हे तयार मिश्रण कढईच्या  तळाशी पसरवून लावावे. त्यानंतर कढई गॅसच्या फ्लेमवर ठेवून वापरावी. आपण गॅसची फ्लेम कितीही मोठी केली तरीही कढईचा पृष्ठभाग करपून काळाकुट्ट होणार नाही. 

सुईत धागा ओवायचा तर चटकन जमत नाही? ५ ट्रिक्स, एका सेकंदात काम करा फत्ते...


अशाप्रकारे या दोन सोप्या टिप्स वापरुन आपण कढईचा पृष्ठभाग काळाकुट्ट होण्यापासून रोखू शकतो.


Web Title: best ways to clean tough burn stains from kadhai Here's What To Do When Your Kadhai Gets All Stained Easiest Way to Clean a Burnt Aluminum Utensils

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.