पावसाळ्यात आजूबाजूला हिरवळ पसरते. पाऊस पडल्यानंतर जीवाला गारवा मिळतो (Mosoon). पण कीटकांमुळे आपली चिडचिड होते. पावसाळ्यात घरी माश्या, डास, चिलटं पाहुणे म्हणून येतात तर खरे, पण यामुळे घरात रोगराई पसरते (Mosquitoes). डासांवर उपाय म्हणून आपण काही केमिकल उत्पादनांचा वापर करतो (flies). हे उत्पादने बाजारात सहज मिळतात. पण यात केमिकल्सचा वापर होत असल्यामुळे आरोग्याला देखील धोका निर्माण होऊ शकतो.
जर बाजारात मिळणाऱ्या केमिकल उत्पादनांचा वापर आपल्याला करायचा नसेल तर, घरगुती ४ उपायांचा वापर करून पाहा. यामुळे नक्कीच आपल्याला कीटकांपासून सुटका मिळेल. शिवाय हे कीटक घराभोवती फिरणार नाही(Best Ways to Get Rid of Mosquitoes in Monsoon Season).
लिंबू - बेकिंग सोडा
कीटकांना घरातून पळवून लावण्यासाठी लिंबू आणि बेकिंग सोड्याचा वापर करून पाहा. यासाठी स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरा. त्यात लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा मिक्स करा. अशा प्रकारे घरगुती स्प्रे रेडी. आता घराच्या कानाकोपऱ्यात फवारणी करा. जिथे जास्त कीटकांचा वावर असेल त्या ठिकाणी फवारणी करा. यामुळे कीटक पळून जातील.
आपण खाताय ती प्लास्टिकची साखर तर नाही ना? FSSAI सांगते, भेसळयुक्त साखर ओळखण्याची १ सोपी ट्रिक
कडूलिंबाचे तेल
कडूलिंबाचे तेल कीटकनाशक म्हणून वापरले जाऊ शकते. एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरा. त्यात कडूलिंबाच्या तेलाचे काही थेंब मिसळा. अशा प्रकारे घरगुती स्प्रे रेडी. घराच्या कोपऱ्यात किंवा ज्या ठिकाणी कीटकांचा जास्त वावर आहे. त्या ठिकाणी शिंपडा. कडूलिंबाच्या उग्र गंधामुळे घरातून कीटक पळून जातील.
काळी मिरी
काळी मिरीच्या उग्र गंधामुळे कीटक घरात राहत नाही. आपण कीटकनाशक म्हणून काळी मिरीचा वापर करू शकता. यासाठी स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरा. त्यात काळी मिरी पावडर घालून मिक्स करा. अशा प्रकारे घरगुती स्प्रे रेडी. ज्या ठिकाणी डास, चिलटं फिरत असतील त्याठिकाणी फवारणी करा. यामुळे घरात कीटक पुन्हा फिरकणार नाही.
पेपरमिंट आणि लॅव्हेंडर
कीटकांना दूर ठेवण्यासाठी आपण पेपरमिंट आणि लॅव्हेंडरचा वापर करू शकता. कीटकांना पळवून लावण्यासाठी हे दोन्ही तेल फायदेशीर ठरू शकते. यासाठी ज्याठिकाणी कीटकांचा जास्त वावर आहे. त्या ठिकाणी फवारणी करा. यामुळे कीटकांकडून होणारा त्रास दूर होईल.