भारतीय मसाल्यांना जगभरात मागणी आहे (Indian Masala). पण नुकतंच एक बातमी सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाली. हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये एमडीएच (MDH) आणि एव्हरेस्टच्या (Everest) चार मसाल्यांवर बंदी घालण्यात आली. या दोन्ही कंपन्यांच्या उत्पादनांमध्ये, पेस्टिसाइड एथिलीन ऑक्साइडचं प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या मसाल्यांवर बंदी घालण्यात आली.
यामुळे आरोग्य तर बिघडतेच, शिवाय कर्करोगाचाही धोका वाढतो. ही बाब पाहता, केंद्र सरकारदेखील अॅक्शन मोडवर आली आहे. या दोन्ही ब्रँडच्या सॅम्पलची टेस्टिंग करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. अशावेळी असा प्रश्न निर्माण होतो की, स्वयंपाकघरातील मसाले खरंच सुरक्षित आहेत का? भेसळयुक्त मसाले नेमके कसे ओळखायचे?(Beware! Spices like Turmeric, Red Chillies in your kitchen can be prone to adulteration).
उघड्यावरचे मसाले विकत घेणं टाळा
अन्न आणि सुरक्षा अधिकारी एनडी शर्मा म्हणतात, 'ओपन मसाल्यांमध्ये मातीच्या धुळीचे कण मिक्स होतात. धुळीचे कण अन्नातील मसाल्यांमध्ये मिसळतात आणि शरीरात जातात, ज्यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात.'
बाजारातून अख्खा मसाला विकत आणा
सध्या बऱ्याच मसाल्यांमध्ये भेसळ केली जाते. त्यामुळे आजारांना आमंत्रण देण्यापेक्षा बाजारातील मसाले किंवा पाकिटातील मसाले खरेदी करणे टाळा. घरीच मसाले तयार करा. शक्यतो पाकिटातल्या मसाल्यांचा वापर पदार्थात करू नये. यामुळे पदार्थाची चव बिघडते. जेव्हा आपण बाजारातून अख्खा मसाला विकत घेऊन भाजी तयार करतो, तेव्हा त्याची चव छान लागते.
चहाशिवाय चैन पडत नाही आणि चहाने ॲसिडिटी होते? चहा पिण्याआधी प्या १ गोष्ट'; त्रास बंद
स्थानिक मार्केटमधून मसाले विकत आणू नका
दुकानदार स्वस्तात देत असले तरीही ओपन मसाले खरेदी करू नये. शिवाय पॅक केलेले मसाले अजिबात वापरू नये. मुख्य म्हणजे मसाल्यांना सुगंध येत नसेल आणि रंग गडद असेल तर, त्याचा वापर पदार्थात अजिबात करू नका. शक्य असल्यास घरी मसाले तयार करा.
भेसळयुक्त मसाले कसे ओळखावे?
हळद पावडर
शुद्ध हळद हलकी पिवळी रंगाची असते. जर हळदीचा रंग गडद असेल तर, समजून जा त्यात भेसळ आहे. यासाठी एका ग्लासमध्ये पाणी घ्या, त्यात एक चमचा हळद पावडर मिक्स करा. जर पाण्यात रंग मिसळला तर हळदीत भेसळ आहे.
धणे पूड
जर धणे पावडरमधून सुगंध येत नसेल, आणि खडबडीत लागत असेल तर, त्यात भेसळ केली असावी.
रात्रीचं जेवण सोडल्यानं खरंच वजन कमी होतं? तज्ज्ञ सांगतात, नक्की खरं काय.. उपाशी राहाल पण..
लाल तिखट
लाल तिखटाच्या पावडरमध्ये भेसळ करण्यासाठी कृत्रिम रंगांचा वापर केला जातो. शिवाय यात विटांचा भूसा देखील मिसळला जातो. जर मिरची पावडर अधिक लाल दिसत असेल तर खरेदी करू नका.