शून्यातून जग निर्माण करणारे लोकं फार कमी आहेत. कितीही उंची गाठली तरी ते जमिनीशी असलेली नाळ तोडत नाही. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे लाफ्टर क्वीन भारती सिंह (Bharti Singh). लाफ्टर क्वीन हे पद तिने अथक परिश्रम करून मिळवले. एखद्याला रडवणं सोपं आहे. पण हसवणं हे खरंच कठीण काम. स्वतःचे दुखः विसरून भारतीने अनेकांना आपल्या विनोदावर हसवले. आज भारती सिंहला कोण ओळखत नाही. तिची कीर्ती सर्वदूर पसरलेली आहे.
पण एक काळ असा होता की, तिला कचरापेटीत पडलेला अर्धा सफरचंद खावासा वाटला. कारण गरीबी इतकी, त्यात पोटातील भूक ही जगू देत नव्हती. एका मुलाखतीत तिने आपल्या खडतर प्रवासाची कहाणी शेअर केली. गरीबी ते लाफ्टर क्वीन हा प्रवास तिचा कसा होता पाहूयात(Bharti Singh Recalled Wanting To Eat Apple From Dustbin, 'Sochti Thi Ye Aadha Bacha Hissa Khaa Loon').
'हालाखीचे दिवस काढत झाली मोठी'
ब्रूट इंडियाला मुलाखत देताना भारतीने आपल्या खडतर - गरिबीतून काढलेल्या दिवसांना उजाळा दिला. 'लोकं अर्धा सफरचंद खाऊन कचरापेटीत टाकून द्यायचे. तेव्हा मनात एकदा असा विचार आला की, तो अर्धा पडलेला सफरचंद उचलून कापून खावा. इथपर्यंत माझे विचार गेले होते. कारण गरीबी होती, शिवाय रिकाम्या पोटाची खळगीही भरायची होती.'
भारतभर सर्वदूर प्रचंड लोकप्रिय असलेल्या ६ अभिनेत्री, कशामुळे लाभली त्यांना देशभर लोकप्रियता?
'सणवार जवळ आल्यानंतर डिप्रेशनमध्ये जायची'
'सणवार कोणाला नाही आवडत. सणाच्या दिवसात लहान मुलं खुश होतात. पण मी लहान असताना डिप्रेशनमध्ये जायची. जेव्हा माझी आई घरातली काम करून मिठाई आणायची, तेव्हा आमची दिवाळी साजरी व्हायची. लहान मुलं जेव्हा फटाके फोडायचे, तेव्हा मी त्यांचा आनंद पाहून टाळ्या वाजवायची.'
'दुसऱ्यांचं उरलेलं जेवण आमच्यासाठी फ्रेश जेवण असायचं'
'माझी आई मी लहान असताना दुसऱ्यांच्या घरात धुनी-भांडी करायला जायची. यातच आमचं काय तो उदरनिर्वाह व्हायचा. ती काम करत असताना मी टॉयलेट साफ करायची. ते लोकं आम्हाला उरलेलं जेवण द्यायचे. याच जेवणावर आम्ही संपूर्ण दिवस काढायचो. त्यांचं शिळं अन्न आम्ही फ्रेश अन्न म्हणून खायचो.'
'सर्व गेलं तरी चालेल, पण आई नाही गेली पाहिजे'
'माझ्या प्रत्येक टप्प्यात आईने साथ दिली. माझ्यासाठी माझी आई स्पेशल आहे. कमवलेल्या पैश्यांचा मी जास्त विचार करत नाही. कारण गेलेला पैसे मी परत कमवू शकते. पण मी आई गमावण्याची कल्पनाही करू शकत नाही. मी त्यांना परत मिळवू शकत नाही.'