अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन (Vicky Jain) ही बिग बॉसच्या घरातली सर्वाधिक चर्चेत असणारी जोडी. बिगबॉसच्या घरात जाण्यापुर्वी ते जसे होते, तसे आता मुळीच राहिलेले नाहीत. बऱ्याचदा तर त्यांच्या तोंडी घटस्फोटाची भाषा येत आहे. हे ऐकून त्यांच्या घरचे लोकच नाही, तर अंकिताचे चाहतेही हैराण झाले आहेत. या शो दरम्यान ते एकमेकांशी खूप भांडत आहेत, वादावादी करताना त्यांचा तोलही ढळत आहे. पण या सगळ्यात अंकिताचं चुकतंय म्हणून तिच्या सासऱ्यांनी तिच्या आईला या गोष्टीचा जाब विचारणं अनेकांना पटलेलं नाही. बघा नेमकं आहे तरी काय हे प्रकरण.. (tough argument between Actress Ankita Lokhande and her mother in law)
बिगबॉसच्या घरात अंकिता आणि तिच्या सासुमध्ये झालेल्या बाचाबाचीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. अंकिताची आई आणि विकी जैनची आई म्हणजेच अंकिताची सासू या दोघी बिगबॉसच्या घरात काही मिनिटांसाठी गेल्या होत्या.
टॉवेल धुतला तरीही त्याला कुबट वास येतो? 'या' पद्धतीने धुवा, टॉवेल होईल स्वच्छ- सुगंधी
त्यावेळी त्यांच्यात काय संभाषण झालं, याचा प्रोमो सध्या साेशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये अंकिताची सासू जे काही बाेललेली आहे, ते ऐकून तिच्या सासू- सासऱ्यांवर पुन्हा एकदा टिकेची झोड उठली आहे. प्रोमोमध्ये असं दिसत आहे की अंकिता आणि तिची सासू एका खोलीमध्ये बसलेल्या आहेत.
यात अंकिताची सासू तिला म्हणतेय की खेळादरम्यान तु जेव्हा विकीला लाथ मारली तेव्हा ते पाहून पापाजींनी म्हणजेच अंकिताच्या सासऱ्यांनी लगेच तिच्या आईला फोन केला आणि त्यांना थेट विचारलं की तुम्हीही तुमच्या नवऱ्याला असंच लाथा मारत होतात का?
तोंडाला चव आणणारी कवठाची चटपटीत चटणी- बघा ५ मिनिटांत होणारी सोपी रेसिपी
हे ऐकताच अंकिता थक्क झाली आणि तिने आईला फोन करण्याची, तिला जाब विचारण्याची काय गरज होती असं सासूला विचारलं. ती पुढे असंही म्हणाली की आताच माझे वडील गेले, माझी आई एकटी असते.. त्यामुळे या सगळ्यात तिला मध्ये घेऊन त्रास देऊ नका... तिचं हे म्हणणं अनेकांना पटलं आहे. काही दिवसांपुर्वी असंच रागाच्या भरात विकीने अंकितावर हात उगारला होता. आता त्याच्या या कृत्याचा जाब त्याच्या वडिलांना विचारायला पाहिजे का, असंही काही नेटकरी चिडून विचारत आहेत.