Join us  

कॅन्सरग्रस्त बहिणीसाठी मोठ्या भावाने केलं 'असं' काही ; व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणीच येईल...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 6:21 PM

Big brother shaves his head in solidarity with sister: व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये भाऊ मुंडण करताना दिसत आहे.

नात्यातील प्रेम, समर्पण पाहून डोळे पाणावतील असा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर  व्हायरल होत आहे.  इंटरनेटचे लक्ष वेधून घेतलेल्या एका व्हिडिओमध्ये एक मोठा भाऊ कर्करोगाशी लढा देत असलेल्या आपल्या बहिणीला साथ देण्यासाठी स्वत:चे केस कापून घेतो. गुडन्यूज मूव्हमेंटने हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्याला आतापर्यंत 26 हजार पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. (Big brother shaves his head in solidarity with sister battling cancer video will make you cry)

सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये भाऊ आपल्या बहिणीचे मुंडण करताना दिसत आहे. तो तिथे असतानाच तो अचानक थांबतो आणि आपले डोके मुंडवू लागतो. हे पाहून त्याच्या बहिणीला रडू कोसळले. तो एक भावनिक क्षण होता. थोड्या वेळाने तिने तिच्या भावाला मुंडण करायला मदत केली.

परदेशी गेलेल्या लेकाला वाढदिवसाच्यावेळी अचानक पाहून वडील भावूक, बापलेकाचं प्रेम पाहून डोळे पाणावतील

“कोणीही एकटे लढत नाही कॅन्सरशी लढा देत असलेल्या बहिणीशी एकजुटीने भाऊ आपले मुंडण करतो,” असे व्हिडिओ कॅप्शनमध्ये लिहिले आहे. व्हायरल व्हिडिओने नेटिझन्सचे डोळे पाणावले. त्यांनी रडत आणि हृदयाच्या इमोजीसह पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत. या बहिणी भावाचा व्हिडिओ पाहून नेटिझन्सनी कौतुकास्पद आणि इमोशनल कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया