Join us  

उर्फी जावेद, नेहमीच का होते ट्रोल? ती म्हणते, पब्लिसिटीच हवी तर विमानतळावर कपडे न घालताच गेले असते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2021 12:10 PM

बिग बॉस ओटीटीमध्ये सहभागी झालेली उर्फी जावेद नेहमीच ट्रोल होत असते. तिचे कपडे, तिने शेअर केलेले व्हिडियोज किंवा तिच्या कमेंट्स... या सगळ्याचीच प्रचंड चर्चा होते. आता पुन्हा एकदा ती जबरदस्त ट्रोल होत आहे.

ठळक मुद्दे उर्फीने अतिशय हॉट आणि खूपच जास्त शॉर्ट कपडे घातलेले आहेत. यामध्ये तिने घातलेले जॅकेट अतिशय शॉर्ट असून त्या जॅकेटच्या खाली गुलाबी रंगाचे तिने  नेमके काय प्रकारचे कपडे घातले आहेत, हेच कळत नाही. 

बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यापासून उर्फी नेहमीच एक चर्चेचा विषय झाली आहे. ट्रोलर्सची तिच्यावर कायमच नजर असते. अर्थात यामध्ये ट्रोलर्सचीच एकतर्फी चुकी आहे, असे मुळीच नाही. उर्फीचे वर्तनच कधीकधी अतिशय टोकाचे असल्याने बिचाऱ्या ट्रोलर्सचाही नाईलाज होतो. आता पुन्हा एकदा उर्फीच्या बाबतीत असाच एक किस्सा घडला आहे. विचित्र कपडे घातलेली उर्फी चाहत्यांना एअरपोर्टवर दिसून आली. यामुळे पुन्हा एकदा तिच्यावर विचित्र विचित्र कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

यामध्ये उर्फीने अतिशय हॉट आणि खूपच जास्त शॉर्ट कपडे घातलेले आहेत. यामध्ये तिने घातलेले जॅकेट अतिशय शॉर्ट असून त्या जॅकेटच्या खाली गुलाबी रंगाचे तिने  नेमके काय प्रकारचे कपडे घातले आहेत, हेच कळत नाही. 

या सगळ्याला मात्र ती आता प्रचंड वैतागलेली दिसते. ती म्हणते की मी सगळे काही प्रसिद्धीसाठीच करते, असे ट्रोलर्सला का वाटते. मी काहीही केले तरी माझ्यावर अशाच घाणेरड्या कमेंट्स करण्यात येतात. बिकीनी घातलेली असली तरीही आणि सलवार कुर्ता घातलेला असला तरीही लोक मला सोडत नाहीत. मी हे सगळे प्रसिद्धीसाठी अजिबात करत नाही.

 

मी अशीच आहे आणि मला असेच राहायला आवडते. जर मी हे सगळे प्रसिद्धीसाठी करायचे होते, तर मी यापेक्षाही अधिक पुढचे पाऊल उचलले असते आणि कपडे न घालताच विमानतळाबाहेर उभी राहिली असते. आता तिच्या या वाक्याने देखील पुन्हा एकदा सोशल मिडियावर खळबळ माजली आहे आणि ती पुन्हा एकदा प्रचंड ट्रोल होत आहे.

 

पुढे बोलताना उर्फी म्हणते की मी अतिशय लहान आणि कंझर्व्हेटिव्ह कुटूंबातील आहे. तरीही अशा कुटूंबातली असूनही माझ्या कपड्यांबाबत मला कुणीही घरातून टोकत नाही. मग घरातलेच काही बोलत नाहीत, तर लोकांना काय अडचण आहे. मी अशी आहे, मला असे कपडे घालायला आवडतात आणि मी अशीच राहणार असे उर्फीने ट्रोलर्सला ठणकावून सांगितले आहे. कपड्यांव्यतिरिक्तही माझ्यामध्ये अशा खूप गोष्टी आहेत, ज्यावर चर्चा होऊ शकते, असेही उर्फीने वैतागून सांगितले आहे. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलबिग बॉससेलिब्रिटी