Lokmat Sakhi >Social Viral > आईची डिलिव्हरी करणाऱ्या डॉक्टरवर अपंग लेकीनं दाखल केला गुन्हा; अन् मिळवले लाखो रूपये; वाचा ही भानगड आहे काय

आईची डिलिव्हरी करणाऱ्या डॉक्टरवर अपंग लेकीनं दाखल केला गुन्हा; अन् मिळवले लाखो रूपये; वाचा ही भानगड आहे काय

Biritish girl sued mother doctor for allowing her to be born wins millions : मुलीने डॉक्टरवर गुन्हा दाखल केल्यानंतर  काय झालं, असा प्रश्न बहुतांश लोक विचारत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 03:32 PM2021-12-02T15:32:38+5:302021-12-02T15:33:29+5:30

Biritish girl sued mother doctor for allowing her to be born wins millions : मुलीने डॉक्टरवर गुन्हा दाखल केल्यानंतर  काय झालं, असा प्रश्न बहुतांश लोक विचारत आहेत.

Biritish girl sued mother doctor for allowing her to be born wins millions | आईची डिलिव्हरी करणाऱ्या डॉक्टरवर अपंग लेकीनं दाखल केला गुन्हा; अन् मिळवले लाखो रूपये; वाचा ही भानगड आहे काय

आईची डिलिव्हरी करणाऱ्या डॉक्टरवर अपंग लेकीनं दाखल केला गुन्हा; अन् मिळवले लाखो रूपये; वाचा ही भानगड आहे काय

अनेकदा स्त्री जेव्हा आई बनते तेव्हा डॉक्टरांच्या अनेक शुभेच्छा मिळतात. पण  ब्रिटनमध्ये (Britain)  एका 20 वर्षीय अपंग मुलीने आपल्या आईची डिलिव्हरी करणाऱ्या डॉक्टरवर (Mother Doctor)  दावा ठोकून लाखो रूपय मिळवले  आहेत. कोणत्याही परिस्थितीत माझा जन्म होऊ द्यायला नको होता, असे म्हणत मुलीने डॉक्टरवर गुन्हा दाखल केला होता. या मुलीच्या म्हणण्यानुसार डॉक्टर तिच्या आईला जन्म अपंग बाळाला जन्म देण्यापासून रोखू शकले असते. (Woman Sues Mom's Doctor For Allowing Her To Be Born, Wins Millions) 

आता हे प्रकरण सोशल मीडियावरही चांगलेच गाजत आहे. खरं तर, मुलीने डॉक्टरवर गुन्हा दाखल केल्यानंतर  काय झालं, असा प्रश्न बहुतांश लोक विचारत आहेत. 2001 मध्ये, ब्रिटिश तरूणी Evie Toombes हिचा जन्म (lipomyelomeningocele) या आजारानं झाला. हे एक प्रकारचं अपंगत्व आहे ज्याला वैद्यकीय शास्त्राच्या भाषेत स्पिना बिफिडा  (spina bifida) असेही म्हणतात. या आजारामुळे एव्ही टूम्ब्स या मुलीनं डॉक्टरांवर खटला भरताना नुकसान भरपाई मागितली होती.

डॉ. फिलीप मिशेलने आईला  योग्य औषधोपचाराचा सल्ला दिला नाही म्हणून एव्हीने गुन्हा दाखल केला. डॉक्टरांनी योग्य सल्ला न दिल्याने ती जन्मत:च अपंग असल्याचं तिचं म्हणणं आहे. डॉक्टर मिशेलने गरोदरपणात आईला योग्य औषधाचा सल्ला दिला असता तर आज ती सामान्य आयुष्य जगत असती. पण तिच्या वाईट स्थितीला डॉक्टर जबाबदार आहेत. असं तिचं म्हणणं आहे.

 कंडोम वापरलं म्हणजे एचआयव्हीचा धोका टळतो? बेजबाबदार लैंगिक वर्तनामुळे तरुण मुलं मुली धोक्यात..

त्यामुळे एव्हीने डॉक्टरकडे लाखो रूपये नुकसान भरपाई मागितली. एव्हीची आई आता 50 वर्षांची आहे, तिची प्रसूती वयाच्या 30 व्या वर्षी डॉक्टर मिशेल यांच्याकडून झाली. मिशेलने एव्हीच्या आईला फॉलिक अॅसिड घेण्याचा सल्ला दिला, परंतु स्पिना बिफिडाच्या प्रतिबंधाबाबत सांगितले नाही. कॅरोलिनने सांगितले की, डॉक्टरांनी तिला सांगितले की जर ती चांगला आहार घेत असेल तर तिला फॉलिक अॅसिडची गरज भासणार नाही.

 90 % लोकांना माहीत नसतं सकाळच्यावेळी नक्की ऊन कधी घ्यायचं? तज्ज्ञांनी सांगितली व्हिटॅमीन D साठी योग्य वेळ

या प्रकरणात, न्यायाधीश रोसालिंड कोए क्यूसी यांनी एव्हीच्या खटल्याला समर्थन दिले आणि लंडन उच्च न्यायालयात एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला. ज्यामध्ये असे सांगितले गेले की, ''जर तिच्या आईचे योग्यरित्या समुपदेशन केले गेले असते तर तिला गर्भधारणा होण्यास उशीर झाला असता आणि गर्भधारणेनंतर महिलेने सामान्य मुलाला जन्म दिला असता," त्यामुळे न्यायमूर्तींनी निकाल देताना डॉक्टरांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.

Web Title: Biritish girl sued mother doctor for allowing her to be born wins millions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.