Join us  

बर्थडेच्या दिवशी चिमुकलीला सापडला अमूल्य हिरा, असे अचानक मिळालेले सरप्राईज पाहून तिला इतका आनंद झाला की...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2023 7:34 PM

7-year-old discovers a grand b'day surprise- a 2.95 carat diamond : कोणाच्या वाढदिवसाची भेट इतकी अमूल्य आणि लक्षात राहण्यासारखी असेल ही आश्चर्याचीच गोष्ट आहे...

आपण वयाने कितीही मोठे झालो तरीही आपल्या वाढदिवसादिवशी आपल्याला कोण काय सरप्राईज देणार याकडे आपलं लक्ष असत. वाढदिवस हा असा वर्षातील एक दिवस असतो की जेव्हा आपल्याला आपण स्पेशल असल्याचा फिल होतो. या दिवशी आपली जवळची मंडळी, मित्र - मैत्रिणी सगळेच आपल्यासाठी काही ना काही स्पेशल प्लॅन करत असतात. आपल्या वाढदिवसादिवशी अचानकपणे मिळणारे सर्प्राइजेस पाहून आपण कधी थक्क होतो तर कधी आनंदित होतो. अशीच काहीशी आश्चर्यचकित करणारी घटना सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे(Birthday surprise: 7-year-old girl finds 2.95-carat diamond while visiting state park).

आपल्या वाढदिवसाच्या दिवशी जर आपल्याला अचानकपणे हिरा सापडला तर यावर आपली प्रतिक्रिया नेमकी काय असेल ? या व्हायरल होणाऱ्या पोस्टमधील अस्पेन ब्राउन या चिमुकलीचा दिनांक १ सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. आपल्या ७ व्या वाढदिवसादिवशी तिने आपल्या कुटुंबियांसह मुरफ्रीस्बोरो, आर्कान्सा येथील क्रेटर ऑफ डायमंड्स स्टेट पार्कला भेट दिली. या क्रेटर ऑफ डायमंड्स स्टेट पार्कला भेट दिल्यानंतर अचानकपणे तिथे तिला तिच्या (7-Year-Old Finds Grand Birthday Gift: A 2.95-Carat Diamond) वाढदिवसाचे मोठे सरप्राईज मिळाले. नेमकी काय आहे ही वाढदिवसाची अनोखी गोष्ट ते पाहूयात(Arkansas 7-year-old makes 2.95-carat diamond discovery on her birthday at state park).

नेमकं या चिमुकलीला सरप्राईज म्हणून मिळालं तरी काय ? 

अस्पेन ब्राउनने (Aspen Brown) तिच्या कुटुंबियांसोबत १ सप्टेंबर रोजी, तिच्या ७ व्या वाढदिवसानिमित्त, मुरफ्रीस्बोरो, आर्कान्सा येथील क्रेटर ऑफ डायमंड्स स्टेट पार्कला भेट दिली तेव्हा तिला आश्चर्यकारक भेट मिळाली. या चिमुकलीचे वडील ल्यूथर ब्राउन यांनी पार्क एजन्सीला सांगितले की, या पार्कमध्ये फिरत असताना तिला उन्हामुळे थोडेसे गरम झाल्यासारखे वाटले. या उष्णतेच्या लागणाऱ्या झळांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तिला थोड्या वेळाची छोटी विश्रांती घ्यायची होती. विश्रांती घेण्यासाठी म्हणून ती कुंपणाच्या बाजूने एका रेषेत असणाऱ्या काही मोठ्या खडकांवर गेली. ती त्या दगडांवर जाताच, थोड्याच वेळात तिचा आवाज येऊ लागला, ती म्हणत होती की, बाबा! बाबा! मला काहीतरी सापडले!' असे म्हणत ती वडील ल्यूथर ब्राउन यांच्याकडे धावत आली होती." तेव्हा तिला २.९५ कॅरेटचा तपकिरी हिरा सापडला होता. 

गरोदरपणात ‘तिने’ केला १४ देशांचा प्रवास, वर्षाच्या बाळाला घेऊनही फिरतेय एकटी जगभर, कारण..

केरळच्या महिलांचा अनोखा डान्स विक्रम, पाहा नृत्याचा व्हायरल व्हिडिओ, डोळ्याचे पारणे फिटते...

जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिका (जीआयए) चे संशोधन शास्त्रज्ञ आरोन पाल्के यांनी इनसाइडरला सांगितले की, ३७.५ एकरच्या जागेत एवढ्या लहान आकाराचा हिरा मिळणे ही एक "विलक्षण दुर्मिळ" घटना आहे. आरोन पालके आणि त्यांच्या संशोधकांच्या पथकाने गेल्या वर्षी उद्यानाला भेट दिली होती. त्यांनी अडीच दिवस शोध घेतला पण घटनास्थळी तेव्हा त्यांना एकही हिरा सापडला नाही, असे पालके यांनी सांगितले. "अरकान्सासमध्ये असा हिरा मिळणे फारच असामान्य आहे," असे आरोन पाल्के म्हणाले. या पार्कमध्ये हिरे शोधणारे अधिकारी त्यांची नावे ठेवतात. अस्पेनच्या वडिलांनी सांगितले की त्यांच्या मुलीला सापडलेल्या हिऱ्याला " अस्पेन डायमंड" असे नाव दिले जाईल. उद्यानातील अधिकाऱ्यांना दररोज सरासरी एक ते दोन हिरे सापडतात, असे उद्यान अधिकाऱ्यांनी सांगितले. पार्क अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, २०१९ मध्ये ३.७२ कॅरेटचा आणखी एक मोठा हिरा जिथे सापडला होता, त्याच जागी अस्पेनला हिरा सापडला होता. या पार्कमध्ये ७५००० हून अधिक हिरे सापडले आहेत कारण १९७२ मध्ये, हे पार्क बनण्यापूर्वी जमीन मालक असलेल्या जॉन हडलस्टन या शेतकऱ्याला हिरे पहिल्यांदा सापडले होते, असे उद्यान अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :सोशल व्हायरल