Lokmat Sakhi >Social Viral > तुम्ही प्यायला आहे का कधी बिर्याणी चहा? चहामध्ये टाकले आहेत चक्क..... बघा व्हायरल व्हिडिओ

तुम्ही प्यायला आहे का कधी बिर्याणी चहा? चहामध्ये टाकले आहेत चक्क..... बघा व्हायरल व्हिडिओ

Weird Food Combination: पाहा ही बिर्याणी चहाची रेसिपी, रेसिपी आवडली तर हा चहा नक्की करून पाहा...(viral recipe of biryani tea)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2024 02:49 PM2024-01-18T14:49:32+5:302024-01-18T14:51:12+5:30

Weird Food Combination: पाहा ही बिर्याणी चहाची रेसिपी, रेसिपी आवडली तर हा चहा नक्की करून पाहा...(viral recipe of biryani tea)

Biryani chai recipe, Have you ever tried biryani chai, viral recipe of biryani tea, how to make biryani tea, masala chai recipe | तुम्ही प्यायला आहे का कधी बिर्याणी चहा? चहामध्ये टाकले आहेत चक्क..... बघा व्हायरल व्हिडिओ

तुम्ही प्यायला आहे का कधी बिर्याणी चहा? चहामध्ये टाकले आहेत चक्क..... बघा व्हायरल व्हिडिओ

Highlights हा चहा करायला तसा सोपा आहे. फक्त त्यासाठी बऱ्याच पदार्थांची जुळवाजुळव करावी लागेल. बघा कसा करायचा हा बिर्याणी चहा..

मसाला चहा, काळा चहा, लेमन टी असे चहाचे प्रकार आपण नेहमी ऐकतो. त्यापैकी काही आपण पिऊनही पाहिले आहेत. पण सध्या बिर्याणी चहा ही रेसिपी सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत आहे (Biryani chai recipe). नाव ऐकूनच चहाचा हा प्रकार नेमका कोणता असेल, याची उत्सूकता वाटतेच (Have you ever tried biryani chai). काही जणांना हा चहा आवडला आहे, तर काही जणांनी या चहा रेसिपीला चांगलंच ट्रोल केलं आहे (viral recipe of biryani tea). हा चहा करायला तसा सोपा आहे (how to make biryani tea). फक्त त्यासाठी बऱ्याच पदार्थांची जुळवाजुळव करावी लागेल. बघा कसा करायचा हा बिर्याणी चहा..

बिर्याणी चहा रेसिपी

 

बिर्यणी चहा कसा करायचा याची रेसिपी nehadeepakshah या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

साहित्य
 
अर्धा लीटर पाणी

२ इंच दालचिनीची काडी

१ दगडफूल

उडीद डाळीचे टम्म फुगलेले आप्पे, पीठ आंबविण्याचीही गरज नाही- मुलांच्या डब्यासाठी चवदार मेन्यू

७ ते ८ मीरे

३ ते ४ वेलची

अर्धा टीस्पून बडिशेप

अर्धा टिस्पून चहा पावडर

केस वाढतच नाहीत? तांदळाच्या पाण्याचा सोपा उपाय करा, भराभर वाढून केस होतील लांबसडक

अर्धा टिस्पून आलं

२ टीस्पून मध

अर्ध्या लिंबाचा रस

पुदिन्याची ४ ते ५ पाने

 

कृती

सगळ्यात आधी गॅसवर पाणी उकळत ठेवा आणि त्या पाण्यात वेलची, दालचिनी, दगडफूड, बडिशेप, मीरे टाकून उकळा.

पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली की मग त्यात चहा पावडर टाका.

बघा स्वयंपाक घरातल्या 'या' पांढऱ्या पदार्थाची जादू- त्वचा आणि केस दोन्हींसाठी ठरतो वरदान

आता एका ग्लासमध्ये आलं, लिंबाचा रस, पुदिन्याची पाने आणि मध टाका. यामध्ये आता आपण आधी उकळून घेतलेला चहा टाका. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घेतलं की बिर्याणी चहा झाला तयार.

या चहामध्ये एवढे सगळे मसाले टाकलेले आहेत, त्यामुळे त्याला बिर्याणी चहा असं नाव देण्यात आलं असावं.

रेसिपी तशी सोपी आहे. त्यामुळे ट्राय करून पाहायला हरकत नाही. हा चहा नसून तो काढा आहे, अशी सूचनाही व्हिडिओपाहून बरेचजण करत आहेत.

सांगा तर मग कधी करता या बोचऱ्या थंडीत गरमागरम मसालेदार बिर्याणी चहा?

 

Web Title: Biryani chai recipe, Have you ever tried biryani chai, viral recipe of biryani tea, how to make biryani tea, masala chai recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.