Lokmat Sakhi >Social Viral > Black Jalebi Recipe: काळ्या रंगाची जिलेबी? होय दिल्लीची ही खासियत, पदार्थ असा की.. बघा व्हायरल व्हिडिओ!

Black Jalebi Recipe: काळ्या रंगाची जिलेबी? होय दिल्लीची ही खासियत, पदार्थ असा की.. बघा व्हायरल व्हिडिओ!

Social Viral: पिवळी, नारंगी जिलेबी तर नेहमीचीच.. खवय्ये असाल तर आता ही दिल्लीची प्रसिद्ध काळी जिलेबी (black mava jalebi from Delhi) चाखून बघा.. अश्शी चव भारी की....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2022 05:13 PM2022-03-31T17:13:32+5:302022-03-31T17:15:06+5:30

Social Viral: पिवळी, नारंगी जिलेबी तर नेहमीचीच.. खवय्ये असाल तर आता ही दिल्लीची प्रसिद्ध काळी जिलेबी (black mava jalebi from Delhi) चाखून बघा.. अश्शी चव भारी की....

Black Jalebi Recipe: Do you know black jalebi? Foodies must try this famous sweet dish from Delhi | Black Jalebi Recipe: काळ्या रंगाची जिलेबी? होय दिल्लीची ही खासियत, पदार्थ असा की.. बघा व्हायरल व्हिडिओ!

Black Jalebi Recipe: काळ्या रंगाची जिलेबी? होय दिल्लीची ही खासियत, पदार्थ असा की.. बघा व्हायरल व्हिडिओ!

Highlightsव्हिडिओ बघा आणि रेसिपी आवडली असेल तर दिल्लीला गेल्यावर काळी मावा जिलेबी खायला विसरू नका. 

साखरेच्या पाकाने ओतपोत भरलेल्या, खमंग कुरकुरीत, थोड्याशा मऊसर अशा गरमागरम जिलेबी म्हणजे खवय्यांचा विकपॉईंट.. पाकातही ही जिलेबी वाटीतून जिभेवर येईपर्यंतही अनेक खवय्यांना धीर धरवत नाही.. पिवळसर, नारंगी रंगाची जिलेबी आपण नेहमीच खातो... पण आता जर जिलेबीचे खरे फॅन असाल तर सरळ दिल्ली गाठा आणि तिथली प्रसिद्ध काळी जिलेबी (black jalebi for foodies) एकदा चाखूनच बघा.. या जिलेबीचा खमंग, गोडसर कुरकुरीतपणा खाणाऱ्याला तिच्या प्रेमात पाडल्याशिवाय राहत नाही....

 

सध्या सोशल मिडियावर याच काळ्या जिलेबीचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.. सुरुवातीला ही जिलेबी जास्त तळल्या गेल्याने जळाली की काय, असं वाटतं... पण तसं मुळीच नाही. आपण नेहमी जी जिलेबी खातो ती मैद्यापासून तयार केली जाते. ही काळी जिलेबी मात्र खवा आणि बटाटा यांच्यापासून तयार झालेल्या पीठाने केली जाते. या जिलेबीला दिल्लीमध्ये मावा जिलेबी किंवा खवा जिलेबी असंही म्हणतात. 

 

जुन्या दिल्लीतील हलवाईची दुकाने आणि प्रसिद्ध जामा मशिदीचा मागचा भाग याठिकाणी ही खास जिलेबी बनवली जाते. मध्यप्रदेशात एक- दोन ठिकाणीही खास काळी जिलेबी बनवली जाते. ही जिलेबी नेमकी कशी केली जाते, याचाच एक व्हिडिओ paidaishi_foodie's इन्स्टाग्राम पेजवर शेअर (instagram share) करण्यात आला आहे. खवा असल्याने या जिलेबीची चव गुलाबजामसारखी लागते, असंही काही खवय्यांनी सांगितलं आहे. रेसिपी आवडली असेल तर दिल्लीला गेल्यावर ही काळी मावा जिलेबी खायला विसरू नका. 


 

Web Title: Black Jalebi Recipe: Do you know black jalebi? Foodies must try this famous sweet dish from Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.