Join us  

ब्लाऊज खूप टाईट होतोय?... शिलाई न उसवता झटपट करा परफेक्ट फिटिंग...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2023 5:32 PM

Blouse Hack For When Your Blouse Is Too Tight : ब्लाऊजची शिलाई न उसवता आपण आपल्या ब्लाऊजची साईझ बदलू शकतो.

साडीवरील ब्लाऊजचे फिटिंग जितके परफेक्ट असेल साडी नेसायला देखील तितकीच सुंदर दिसते. ब्लाऊजचे माप, फिटिंग अगदी आपल्याला फिट होत असेल किंवा आपल्या मनासारखे झाले असेल तरच ब्लाऊज छान दिसतो. याउलट ब्लाऊज लूज, ढगळा किंवा परफेक्ट शिवला नसेल तर तो आपल्या अंगावर फिट बसत नाही आणि दिसतानाही विचित्र दिसते. बायका साडीवरचे ब्लाऊज शिवायला टेलरला देताना १०० वेळा त्याला व्यवस्थित फिटिंगचा आणि मापाचा शिवण्याची ताकीद देतात.

आजकाल बाजारात रेडिमेड ब्लाऊजदेखील खूप सुंदर डिझाईनचे मिळतात. आपण शिवून घेतलेला किंवा रेडिमेड बाजारातून तयार असलेला ब्लाऊज आपल्याला कधी ढगळा किंवा लहान होऊ शकतो. एखाद्यावेळी आपला जुना ब्लाऊज आपण खूप वर्षांनी कपाटातून काढतो आणि आपण जाड झाल्यामुळे काहीवेळा आपला सगळ्यात आवडता ब्लाऊज आपल्याला होत नाही. अशावेळी आपल्याला ती आवडती साडी नेसायची असते पण ब्लाऊज होत नसल्यामुळे ती नेसणं आपण टाळतो. पण आता चिंता करू नका ब्लाऊजची शिलाई न उसवता आपण आपल्या ब्लाऊजची साईझ बदलू शकतो(Blouse Hack For When Your Blouse Is Too Tight).

एक सोपी ट्रेक समजून घेऊयात...

आपला आवडता ब्लाऊज होत नसेल तर आपण ब्लाऊजच्या आतील एक्स्ट्रा शिलाई सोडून त्याची साईझ वाढवतो. परंतु असे वारंवार केल्यास शिलाई उसवण्यात ब्लाऊजची फिटिंग बिघडते. तसेच शिलाई काढल्यामुळे तेथील कापड खराब होऊन फाटण्याची शक्यता असते. अशावेळी आपण एक सोपा उपाय करून ब्लाऊजची साईज बदलू शकतो. 

ब्लाऊजची साईझ बदलण्यासाठी ब्रा हुक एक्सटेंडरचा वापर कसा करावा याबाबतचा व्हिडीओ simran_nikky व exponentialuofficial या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. 

 

कृती :- 

१. बाजारात ब्रा ची साईज वाढविण्यासाठी ब्रा हुक एक्सटेंडर (Bra Hook Extender) सहज मिळतात.२. या ब्रा हुक एक्सटेंडरला ब्रा चे हुक अडकविण्यासाठी आकडे दिलेले असतात.  ३. ब्लाऊजच्या हुकमध्ये हे अडकवून घ्यावे.   ४. आता हे ब्रा हुक एक्सटेंडर लपविण्यासाठी त्याच्यावर स्कार्फ गुंडाळून त्याचा छान बो येईल असा आकार द्यावा.५. एखाद हेव्ही मोठं इयरिंग घेऊन ब्रॉच म्हणून त्यावर लावू शकता. असे केल्याने तुमच्या ब्लाऊजची साईज वाढेल आणि ब्रा हुक एक्सटेंडर लपवण्यास मदत होईल.

टॅग्स :सोशल व्हायरलफॅशन