Lokmat Sakhi >Social Viral > आर. माधवन स्वयंपाकात सुगरण; स्वतःच केला घरी उत्तम पिझ्झा!

आर. माधवन स्वयंपाकात सुगरण; स्वतःच केला घरी उत्तम पिझ्झा!

Social viral: बॉलीवूड अभिनेता आर. माधवन हा फक्त अभिनयातच नाही, तर स्वयंपाकातही चांगलाच तरबेज आहे.. म्हणूनच तर त्याने नुकताच घाट घातला होता पिझ्झा करण्याचा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2021 03:56 PM2021-12-28T15:56:01+5:302021-12-28T15:57:44+5:30

Social viral: बॉलीवूड अभिनेता आर. माधवन हा फक्त अभिनयातच नाही, तर स्वयंपाकातही चांगलाच तरबेज आहे.. म्हणूनच तर त्याने नुकताच घाट घातला होता पिझ्झा करण्याचा....

Bollywood Actor R. Madhavan made pizza for the very first time | आर. माधवन स्वयंपाकात सुगरण; स्वतःच केला घरी उत्तम पिझ्झा!

आर. माधवन स्वयंपाकात सुगरण; स्वतःच केला घरी उत्तम पिझ्झा!

Highlightsपिझ्झाचा फोटो शेअर करत माधवनने कॅप्शन टाकली आहे की हा पिझ्झा जसा दिसतो तसाच तो झाला आहे...

मॅडी म्हणजेच आर. माधवन (R.Madhavan) त्याच्या सावळ्या रंगामुळे आणि कॅची लूक्समुळे अनेक तरूणींचा फेव्हरेट आहे.. त्याचा रेहेना है तेरे दिल मे (Rehna hai tere dil me)हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला होता, तेव्हा माधवन म्हणजे अनेकींसाठी त्यांचा चॉकलेट हिरो होता... हाच माधवन आता अभिनयासोबतच स्वयंपाक घरातही पाककलेचे धडे गिरवतो आहे. 

 

हो हे खरं असून माधवनने स्वत:च याबाबतची माहिती सोशल मिडियावर शेअर केली आहे. सुटी आणि थोडा निवांत वेळ असला की अनेक जणांना स्वयंपाक घरात काही प्रयोग करण्याची इच्छा होते. अनेक महिलांना तर इच्छा असो वा नसो, दिवसातून दोन- तीन वेळा स्वयंपाक करावा लागतोच हा भाग निराळा. पण काही पुरूषांनाही स्वयंपाकात भारीच इंटरेस्ट असतो. नवनविन पदार्थांच्या भन्नाट रेसिपी (pizza recipe) ट्राय करणे त्यांना आवडते. अशा मंडळींपैकीच एक आहे माधवन.

 

त्यानेही पिझ्झा (pizza made by R.Madhavan) करण्याचा प्रयोग केला आणि ती पोस्ट सोशल मिडियावर शेअर केली. पिझ्झा हा बेससकट तुम्ही घरी केला तर तो खरोखरंच खूप अवघड पदार्थ आहे. जर बेस रेडिमेड आणून घरी त्यावर टोपिंग करून बेक केलं तर मात्र पिझ्झा अगदी सोपा आहे. आता माधवनने नेमका कोणत्या स्टाईलचा पिझ्झा केला होता आणि त्यासाठी किती मेहनत घेतली होती, हे काही त्याने सांगितले नाही.

 

तयार झालेल्या पिझ्झाचा फोटो शेअर करत माधवनने कॅप्शन टाकली आहे की हा पिझ्झा जसा दिसतो तसाच तो झाला आहे... माधवनने आयुष्यात पहिल्यांदाच केलेल्या या पिझ्झाचे फोटो तर दिसायला उत्तमच झाले आहेत. वेगवेगळे सॉस, चीज आणि भाज्यांचा वापर करून त्याने केलेला पिझ्झा जर जास्तच बेक झाला आहे, असे फोटो पाहून वाटते. शेवटी काय की पिझ्झा चवीला कसा का होईना, पण त्याने स्वयंपाक घरात जाऊन प्रयोग करून पाहिला हे जास्त महत्त्वाचे....

 

Web Title: Bollywood Actor R. Madhavan made pizza for the very first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.