'इन आँखों की मस्ती के' खरंच मस्ताने हजारो आहेत. बॉलीवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री अर्थात रेखा (Rekha) सर्वांचीच फेवरीट अभिनेत्री आहे. रेखा यांचं फिल्मी करिअर जितकं चर्चेत राहिलं, तितकंच त्यांचं खासगी आयुष्यही राहिलं. त्यांचा चाहतावर्ग फार मोठा आहे. मुख्य म्हणजे ६९ व्या वयात पदार्पण करूनही त्यांच्या अदाकारीत काही कमतरता जाणवत नाही. त्यांची ब्युटी त्यांचा फिटनेस हा तरुणींना लाजवेल असा आहे.
टाइमलेस ब्यूटी अर्थात रेखा यांचा आज वाढदिवस. आपण त्यांच्याविषयी अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या क्वचितच लोकांना ठाऊक असतील. त्यांचे आई-वडील, त्यांना बहिणी किती होत्या? त्यांच्या बहिणी नेमकं करतात काय? त्या पण रेखा सारख्या अभिनेत्री आहेत का? पाहूयात(Bollywood Actress Rekha Has 6 Sisters Who Are Celebrities In Their Fields).
रेखा हे त्यांचं खरं नाव नाही..
१० ऑक्टोबर १९५४ रोजी चेन्नई येथे रेखा यांचा जन्म झाला. रेखा यांचे खरे नाव भानुरेखा जेमिनी गणेशन असं आहे. रेखा यांच्या वडिलांचे नाव जेमिनी गणेशन आणि आईचे नाव पुष्पवल्ली आहे. वयाच्या १३ व्या वर्षी तेलुगू चित्रपटात बालकलाकाराची भूमिका सकारात रेखा यांनी रुपेरी पडद्यावर एन्ट्री केली. त्यांनी आपल्या करिअरमध्ये १८० हून अधिक चित्रपटात काम केले. जेमिनी गणेशन हे साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते.
रेखा यांना भावंडं किती?
रेखाचे कुटुंब फार मोठे होते. तिला ६ बहिणी तर एक भाऊ होता. पण आपल्याला माहित आहे का? की तिला एकच सख्खी बहिण आहे, बाकीच्या सगळ्या या सावत्र आहेत. हो, त्यांना पाच सावत्र बहिणी आहेत. त्यांची नावे विजया चामुंडेश्वरी, सतीश कुमार, राधा उस्मान सैयद, रेवती स्वामीनाथन, कमला सेल्वराज, नारायणी गणेश आणि जया श्रीधर अशी आहेत.
माझ्यावर ती आईसारखी माया करते! अभिनेत्री तितिक्षा तावडे सांगतेय, जीव लावणाऱ्या बहिणीची साथ
अविवाहित आईची मुलगी आहे रेखा
रेखाची आई पुष्पावल्ली या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांनी जेमिनी गणेशन यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. याच काळात दोघांचे अफेअर सुरु झाले. रेखाच्या जन्माच्यावेळी जेमिनी गणेशन आणि पुष्पावल्ली यांचे लग्न झाले नव्हते. कित्येक वर्षे जेमिनी यांनी रेखाला आपली मुलगी असल्याचे मान्य केले नव्हते. काही वर्षांनी जेमिनी आणि पुष्पावल्ली यांनी लग्न केलं. लग्नानंतर त्यांच्या दुस-या मुलीचा राधा उस्मान सैयदचा जन्म झाला. त्यामुळे रेखाला एकच सख्खी बहीण आहे.
जेमिनी गणेशन आणि अनेक नाती
जेमिनी गणेशन यांच्या आयुष्यात चार स्त्रिया आल्या होत्या. १९४० मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी त्यांचे लग्न अलामेलूसोबत झाले होते. असे म्हटले जाते, की अलामेलू या त्यांच्या एकमेव कायदेशीररित्या पत्नी आहेत. त्यानंतर त्यांचे अभिनेत्री पुष्पावल्ली, सावित्री आणि जुलियाना यांच्यासोबत विवाहबाह्य संबंध होते.
रेखाची भावंडं करतात काय?
रेखाची सर्वात मोठी बहिण ही रेवती स्वामीनाथन आहे. ती अमेरिकेत राहते. रेवती व्यवसायाने रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट असून, ती लाईम लाईटपासून दूर राहते. तर, कमला सेल्वराज ही रेखाची दुसरी मोठी बहिण. कमलाही तिच्या मोठ्या बहिणीसारखी डॉक्टर आहे. कमला यांचे चेन्नईमध्ये हॉस्पिटल आहे. नारायणी गणेशन हे रेखाच्या तिसऱ्या बहिणीचे नाव. नारायणी मीडियात कार्यरत आहे. ती पत्रकार असून एका आघाडीच्या वर्तमानपत्रात काम करते. विजया मुंडेश्वरी ही रेखाची चौथी बहीण. ती फिजिओथेरपिस्ट असून, विजया तिच्या कुटुंबासह तामिळनाडूमध्ये राहते.
रेखाला एकच सख्खी बहीण आहे. तिचे नाव राधा आहे. राधा एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केले. लग्नानंतर तिने आपल्या अभिनय कारकिर्दीवर पूर्णविराम दिला असून, ती सध्या अमेरिकेत स्थायिक झाली. राधा ही हुबेहूब रेखासारखीच दिसते. रेखाच्या सर्व बहिणींमध्ये सर्वात धाकटी बहीण जया श्रीधर आहे. इतर बहिणींप्रमाणे जयाही वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत आहे. ती आरोग्य सल्लागार म्हणून काम करते. तर भाऊ सतीश कुमार परदेशात स्थायिक झाला आहे.