Lokmat Sakhi >Social Viral > अजबच! बाथरूमध्ये ८ मिनिटे टाईमपास केला म्हणत बॉसने महिलेला घ्यायला सांगितली सिक लिव्ह, पण...

अजबच! बाथरूमध्ये ८ मिनिटे टाईमपास केला म्हणत बॉसने महिलेला घ्यायला सांगितली सिक लिव्ह, पण...

Boss asks woman employee to take sick leave after she took an 8 minute washroom break viral post : ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2023 11:40 AM2023-12-31T11:40:50+5:302023-12-31T11:44:25+5:30

Boss asks woman employee to take sick leave after she took an 8 minute washroom break viral post : ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली

Boss asks woman employee to take sick leave after she took an 8 minute washroom break viral post : Strange! The boss asked the woman to take sick leave saying that she passed the time for 8 minutes in the bathroom, but... | अजबच! बाथरूमध्ये ८ मिनिटे टाईमपास केला म्हणत बॉसने महिलेला घ्यायला सांगितली सिक लिव्ह, पण...

अजबच! बाथरूमध्ये ८ मिनिटे टाईमपास केला म्हणत बॉसने महिलेला घ्यायला सांगितली सिक लिव्ह, पण...

ऑफीस म्हटलं की आपण घराप्रमाणेच दिवसातले ८ ते १० तास आपण तिथेच असतो. त्यामुळे अनेक जणांसाठी तर ऑफीस हे दुसरं घरच असतं. त्यामुळे ऑफीसमध्येच आपण नाश्ता, जेवण, वॉशरुम अशा सगळ्या गोष्टी करतो. अनेकदा तर घरुन निघायला उशीर झाला तर महिला मेकअपही वॉशरुममध्येच करतात. दिवसभर ऑफीसमध्ये आपण ३ ते ४ वेळा तर वॉशरुमला नक्की जातो. पण वॉशरुमला किती वेळ जावे असा नियम अद्याप तरी कोणत्या कंपनीने घातलेला पाहायला मिळाला नाही. मात्र एका महिलेला कंपनीने ८ मिनीटे वॉशरुमला गेली म्हणून वेठीस धरल्याची घटना नुकतीच समोर आली आहे (Boss asks woman employee to take sick leave after she took an 8 minute washroom break viral post ).

या महिलेने रेड इट या सोशल मीडिया साईटवर याविषयी भावना व्यक्त केल्या असून त्यावर चांगलीच चर्चा रंगली आहे. वर्क फ्रॉम होम काम करत असलेली एक महिला ८ मिनिटांसाठी वॉशरुममध्ये गेली. त्यावेळी तिने लगेचच ऑनलाईन यावे नाहीतर सिक लिव्हसाठी अर्ज करावा असे तिच्या बॉसने म्हटले आहे. अशाप्रकारे दबाव आणणे ही चुकीची गोष्ट असल्याने आपण बॉसच्या या वागण्यामुळे खूप हैराण झाल्याचेही या महिलेने पोस्टमध्ये म्हटले आहे. यानंतर आपण नोकरी करत असलेल्या ठिकाणी आपण अनेकदा ओव्हर टाईम करतो, आपल्या कामाचा भाग नसलेले काम करतो असेही महिलेने सांगितले आहे. तरीही आपल्याला अशाप्रकारे चुकीची वागणूक देण्यात आल्याचे या महिलेने म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी महिलेने केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आणि त्यावर अनेकांनी कमेंटसही केल्या आहेत. ८ मिनीटांचा वॉशरुम ब्रेक घेणे ही सुट्टी घ्यायला लावण्यासारखी गोष्ट अजिबात नाही असे काही जणांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. कर्मचाऱ्यांशी अशाप्रकारे वागणे हे कर्मचाऱ्यांच्या अधिकारांचे उल्लंघन करण्यासारखे आहे. तर अशाप्रकारे त्रास देणाऱ्या बॉसची लेखी तक्रार कर असेही काही जणांनी सुचवले आहे. तर आपण या नोकरीला वैतागलो असून नोकरी सोडत आहोत आणि नवीन नोकरीच्या शोधात आहोत असे या महिलेने म्हटले आहे.

  

Web Title: Boss asks woman employee to take sick leave after she took an 8 minute washroom break viral post : Strange! The boss asked the woman to take sick leave saying that she passed the time for 8 minutes in the bathroom, but...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.